Vasai's e-store

Vasai's e-store आपल्या सामान सेवा यांची ऑनलाईन विक्री साठी व होम डिलेव्हरी साठी आपण एकत्र येत आहोत.

14/09/2021

*आज पासून ऊधारी बंद करा* 🚀

भारतातील जवळ जवळ ३६% लहान व्यवसाय उधारीमुळे बंद पडतात, यात मुख्यत्वेकरून किराणा दुकान, बिल्डिंग मटेरियल, कृषी खते व औषधे इत्यादी अनेक प्रकारचे लहान मोठे व्यवसाय येतात. उधारीची सुरवात ही अगदी लहान प्रमाणात व वैयक्तिक ओळखीमुळे होते. व्यवसाय वाढावा म्हणून दुकानदार उधार देतो व शेवटी उधारी वसूल न झाल्यामुळेच व्यवसाय बंद करायची वेळ येते. या विषयावर काही मार्गदर्शक तत्त्वे व्यावसायिकांनी घालून घेतली पाहिजेत.*

*१)* वैयक्तिक ओळख व घसट करू नका. 'घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या?' व्यवसाय करत असताना ग्राहकांशी वैयक्तिक व खाजगी व्यवहार, बोलणे चालणे टाळा. तुम्ही व्यवसाय करण्यास बसला आहात, हे ओळखी व मैत्री वाढवायचे माध्यम नव्हे. पैसा हाच तुमचा मित्र हे लक्षात ठेवा.

*२)* कामाशिवाय बसू नये, व्यवसायाच्या ठिकाणी हा नियम तुम्ही लावा. ग्राहकांना त्यांच्या खरेदी व व्यवसायाव्यतिरिक्त बिनकामाचे फार वेळ बसू देऊ नये. यातूनच उधारीला सुरुवात होते.

*३)* स्पष्टवक्तेतपणा ठेवा. 'विनंती केली आहे. आम्ही काय पळून जातो का? ऐवढा विश्वास नाही का?' नम्रपणे हात जोडा व सांगा, 'दोस्ती मेरे से करो, धंदे से नही. उधार मागू नका, मित्र म्हणून मी एक काय दोन वेळा चहा पाजतो.'

*४)* काही प्रमाणात व काही दिवसासाठी काही व्यवसायात उधारी द्यावीच लागते. उदा. कंपनीचे टेंडर, दुधाचा व्यवसाय, पेपर दूध इत्यादी. अशा उधारीचे प्रमाण एकूण व्यवसायाच्या उलाढालीच्या २५% हून अधिक नसावे म्हणजे काही प्रमाणात उधारी उशिरा वसूल झाली तर फारसा फरक पडणार नाही

*५)* वह्या भरलेल्या व गल्ला मोकळा. काही जणांची मी हास्यास्पद परिस्थिती पाहतो. उधारीच्या वह्या भरलेल्या, एकूण १० लाख येणे आहे पण आज गल्ल्यात ५ हजारही नाहीत. खेळता पैसा नसल्यामुळे धंदा ठप्प झालेला असतो.

*६)* प्रत्येक ग्राहकाची उधारी पेलण्याची ऐपत लक्षात ठेवून उधारी द्या. एखाद्याच्या दोन महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त उधार देऊ नका. पहिली उधारी दिली नसेल, तर इथून पुढे रोखीने व मागची उधारी घ्या. त्याला २ ते ३ टप्पे करा.

*७)* कोणत्याही सबब पुराव्याशिवाय उधार देऊ नका. उदा. पी.डी.सी चेक, कायमचा पत्ता, नोकरीचे ठिकाण इत्यादी. स्वत:कडे जेवढे भांडवल असेल तेवढ्याचीच उधारी करा, बाजारातील उचललेल्या मालावर उधारीचा धंदा करू नका, नाहीतर दोन्हीकडची पण जाईल. उधारीची भीड चेपत नसेल, तर धंदाच करू नका; कारण तो निश्चित नुकसानीचा मार्ग आहे.

30/04/2021

सहकार नेते श्री नितिन म्हात्रे साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून,वसईचा राजा गणेशो.....

03/04/2021

Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

05/03/2021

WhatsApp Group Invite

*VVCMC ने लागूं केलेला TREAD LICENSE म्हणजेच व्यापार परवाना बद्दल जाणून घ्या काय आहे ते नक्की...?*
16/12/2020

*VVCMC ने लागूं केलेला TREAD LICENSE म्हणजेच व्यापार परवाना बद्दल जाणून घ्या काय आहे ते नक्की...?*

VVCMC व्यापार परवाना (Trade License) आणि त्याचे नूतनीकरण याबद्दल...

10/12/2020

Address

Vasai
401201

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+8805107455

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasai's e-store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vasai's e-store:

Share