22/11/2019
#मर्दानी
बलात्कार हा शब्द ही ऐकायला
नको वाटतो.पण दुर्दैवाने टीव्ही वर, वर्तमानपत्रात सतत बलात्काराच्या बातम्या येत असतात..
आज दुपारी बदलापूरहुन मला माझ्या ताईचा काॕल आला की आशा तुझी व पोलीसांच्या मदतीची गरज आहे.पण 100 नंबर लागतच नाहीये. तिला विचारल काय झाल.तिने तिच्या वरच्या मजल्यावर झालेली घटना सांगितली. तिला म्हटल काळजी करु नका मी लगेच निघते. मी कल्याण वरुन कन्ट्रोल ला काॕल केला.व त्यांना बदलापूर पोलीस स्टेशनला कळवायला सांगितल.व सांगितल की घटनास्थळी पोलिसांना यायला सांगा मी ही कल्याण वरुन पोहचते.माझा नवरा नुकताच जेवायला बसला होता.त्याला म्हटल चल.आपल्याला लगेच निघायच आहे.ताट तसच ठेवुन आम्ही बदलापूर ला निघालो.
घटना अशी घडली होती.की माझ्या बहीणीच्या बिल्डिंग मध्ये एक जोडप राहत.दोघेही वेल अॕजूकेटेड .दोघेही कामाला जाणारे.तिला बर नव्हत म्हणून दोन तीन दिवसापासून ती कामाला जात नव्हती ..आज दुपारी तिच्या घरी त्यांचा एक परीचित आला.त्याच वय वर्ष चाळीस.साहजिकच ओळखीचा असल्याकारणाने तिने त्याला घरात घेतले. एक सुसंस्कृत महीला पति नसताना कोणी आल तर घराचा दरवाजा उघडाच ठेवते तिने ही तसच केल.पण त्याच्यात एक राक्षस लपलेला होता.ती आत वळताच त्याने फ्लॕटचा दरवाजा लावून घेतला. व तिच्यावर बळजबरी करु लागला. ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली पण आजुबाजूच्या लोकांना नेमक कळत नव्हत की आवाज येतोय कुठून.हीने मात्र ठरवल होतं की ह्याच्या वासनेला आपण बळी पडायच नाही. झटापटीत तिच लक्ष पॕसेज मधल्या वाॕश बेसिनवरच्या आरशाकडे गेलं नी तिने क्षणाचाही विलंब न करता तोच आरसा खेचून त्या नराधमाच्या डोक्यात दणादण हाणला.तो अचानक झालेल्या हल्ल्याने गोधळला.तस हीने त्याला ढकलून बाहेर पळ काढला नी बाहेर पडता पडता फ्लॕटचा दरवाजा लावून घेतला व बाहेरुन कडी लावली.व पाचव्या मजल्यावरुन पळतच खाली आली व तिला माझ्या बहीणीचा दरवाजा उघडा दिसला नी ती बहीणीच्या घरात घुसली नी मग ती एकदम कोलमडून पडली.
मी पोहचली त्याच वेळेस पोलीस पोहचले.मी व माझ्या बहीणीने तिला खुप धीर दिला. तिला सावरल. तिचा नवरा येईपर्यंत मी तिथेच होती.नवरा आल्यावर तर तिच्या अश्रुंचा बांधच फुटला.त्याच्या मिठीत ती बेशुद्ध च पडली.
स्री ही हळवी असतेच पण तिने योग्य वेळी जे धाडस दाखवल त्याला माझा सलाम..
एका आरश्यानी तिने त्या नराधमाला रक्तबंबाळ करुन सोडला.बिल्डिंग मधली लोक जमली व फटीतून आत पाहील तेव्हा तो बेशुद्ध पडलेला होता.
आज मॕन डे दिवशी एका मर्दानीने एका नामर्दाला नामोहरण केल.
ह्यालाच स्रीशक्ति म्हणतात