15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्यदिन २०२६ 🇮🇳
मेहता मल्टी-स्टोअर्स, सातारा
पोवई नाका येथील मेहता मल्टी-स्टोअर्समध्ये १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्काराच्या मानकरी आणि सातारा जिल्हा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती विकास मोरे यांच्या हस्ते झालेला ध्वजारोहण सोहळा.
दहिवडीपासून ऑनलाइन बुद्धिबळाच्या माध्यमातून सुरू झालेला संस्कृती मोरे यांचा प्रवास हाँगझोऊ, चीन येथील आशियाई पॅरा गेम्सपर्यंत पोहोचला. महिला सांघिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक मिळवून त्यांनी भारताचा गौरव केला. अवघ्या १९व्या वर्षी वर्ग-१ पदावर नियुक्ती मिळवून त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली.
यावेळी नगरसेवक शंकरराव माळवदे यांनी संस्कृती मोरे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा उल्लेख करत त्यांच्या कर्तृत्वातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
आपल्या मनोगतात संस्कृती मोरे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याला दिले.
पोवई नाका व्यापारी मित्र मंडळ आणि मेहता परिवाराच्या वतीने संस्कृती मोरे यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याचे त्यांचे स्वप्न साकार व्हावे, हीच सदिच्छा!
🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन