06/11/2020
*आज थोडेसे तेल विषयी*
आहारात कोणते तेल वापरावे?
आरोग्यावर होणार्या परिणामा नुसार तेलाची क्रमवारी
1 - सगळ्यात खराब पाम तेल ( आपण आजारी पडल्यावर डॉक्टरांचा सल्ला बाहेरचे पदार्थ खाऊ नका, कारण ते सर्व याच तेलात तळले जातात, परत कारण स्वस्त असतात )
2 - रिफाईंड तेल. ( रंगहीन, गंधहीन, स्वादहीन आणि 😊 पौष्टिकताहीन )
3- आॅलिव तेल, ( खुप महाग आणि भारतीय खाद्यपदार्थांसाठी अयोग्य )
4 - शुद्ध लाकडी घाणा तेल ( या मध्ये सर्व घटक रंग, गंध, स्वाद आणि पौष्टिकता असते )
आयुर्वेदा नुसार व स्व. राजीव दिक्षीत जी नुसार तेलाचे दोन अती महत्त्वाचे नियम -
1 - शरीरातील वाताचे रोग ( ह्रदय रोग, लकवा किंवा पॅरलासिस, सांधेदुखी इ. ) जर घालवायचे असतील तर फक्त आणि फक्त शुद्धच तेल खावे लागेल. ( शुद्ध कोणते ते आपण नंतर पाहू )
2 - तेल एकदा गरम ( तळण्यासाठी ) केल्यानंतर परत वापरायचे नाही.
आपण खातो रिफाईंड तेल.
रिफाईंड तेल निर्मिती करताना * solvent Method वापरली जाते. यात जास्त तेल निर्मिती साठी Hexane ( Petroleum product ) नामक रसायन वापरतात. ( आपण कोणते petroleum पदार्थ खातो. कोणतेच नाही, जर तेलात हा पदार्थ असेल तर मग का आजार वाढणार नाही. ) मग Degummining and Neutralization व Deodorizing करतात. गंधहीन व चिकटपणा घालवण्यासाठी. तेलाला 2000 c वर उकळले जाते ( घरी उकळलेले तेल 200 c ते 450 c असते ) आता तेला तील गंध म्हणजे प्रोटीन (डाळीं नंतर तेलात जास्त प्रोटॉन ) तेच काढले. व चिकटपणा म्हणजे Fatty acids HDL ते सुद्धा काढले. मग राहीले काय? शेंगदाणा रिफाईंड तेलाला तुम्ही पाहीले असेल गंध ही नसतो आणि चिकटपणा ही.