21/02/2015
आता पेन्शन प्रत्येकाला
केंद्र सरकारची स्वावलंबन पेन्शन योजना
केंद्र सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकासाठी स्वावलंबन पेन्शन योजना सुरु केली आहे. आजपर्यंत पेन्शन ही फक्त सरकारी नोकरांची मक्तेदारी होती. प्रगत देशांमध्ये प्रत्येक नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. भारतामध्ये अशी सुविधा नुकतीच सुरु करण्यात आली आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि स्वावलंबन पेन्शन योजना अशा या दोन योजना आहेत. या योजनेमध्ये पॅन क्रमांकासारखा किंवा आधारकार्डासारखा प्राण क्रमांक ( परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर ) दिला जातो. प्रत्येक भारतीय नागरिकाला या योजनेमध्ये खाते उघडता येते. भारत महासत्ता होत असताना भारताचे आयुर्मान वाढले आहे. भविष्यामध्ये भरपूर जगणे ही सुद्धा एक समस्या होणार आहे. निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने पेन्शन खाते उघडणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती मग ती डॉक्टर, वकील, इंजिनिअर असो किंवा शेतकरी, मजूर, गवंडी, व्यापारी, उद्योजक, आयटी सॉफ्टवेअर शेत्रातील असो किंवा रिक्षा, टॅक्सी ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, भटजी, फळभाजी विक्रेते, हमाल, फेरिवाले, सिने नाट्य कलाकार, सामाजिक कार्यकर्ते असो, त्यांना सर्वांना अगदी गृहिणींना देखील या योजनेमध्ये खाते उघडता येते. अनिवासी भारतीयांना देखील या योजने मध्ये सहभागी होता येते.
प्रा. क्षितिज पाटुकले हे इंश्युरन्स अॅरकॅडमीचे संचालक असून केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेची सविस्तर माहिती देणारे “ पेन्शन आता प्रत्येकाला ” हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. या पुस्तकामध्ये पेन्शन म्हणजे काय, गरज पेन्शनची, स्वावलंबन पेन्शन योजना, नॅशनल पेन्शन सिस्टीम, पेन्शन खाते कसे उघडायचे, पेन्शन आणि आर्थिक नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. याचबरोबर सध्या गाजत असलेल्या पंतप्रधान जनधन योजनेवरही प्रकाश टाकला आहे. पेन्शन खाते उघडायचा नमुना अर्ज तसेच नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे ही या पुस्तकामध्ये समाविष्ठ केली आहेत. सोप्या भाषेमध्ये प्रत्येक व्यक्तीला पेन्शनची माहिती होईल. हे पुस्तक रुद्र प्रकाशन तर्फे प्रकाशित केले जात असून सध्या त्याची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु आहे. पुस्तक १ मार्च २०१५ रोजी प्रकाशित होणार आहे. अधिक माहितीसाठी रूद्र प्रकाशन पुणे मोबाईल – ९३७११०२४३९ आणि www.rudraprakashan.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.