Sahyadri Books

Sahyadri Books Sahyadri Books is online bookstore selling books about Sahyadri, its history nature and travel.

Books are available mostly in Marathi, But English and Hindi books are also available.

महाराष्ट्रातील विरगळयुध्दात, कधी साहसी कृत्यात प्राण गमावलेल्यांना वीर म्हटले जाते. अशा वीरांची स्मारके गावकऱ्यांकडून अथ...
07/01/2026

महाराष्ट्रातील विरगळ
युध्दात, कधी साहसी कृत्यात प्राण गमावलेल्यांना वीर म्हटले जाते. अशा वीरांची स्मारके गावकऱ्यांकडून अथवा कुटुंबियांकडून आदरपूर्वक उभी केली गेली. त्यांना वीरगळ म्हटले जाते. वीरगळांची संख्या आपल्या येथील खेडोपाडी लक्षणीय प्रमाणांत आढळते. सती गेलेल्या मृत स्त्रियांची स्मारकेही आढळतात. वीरगळ हे ही आपला इतिहास समजून घेण्याचे साधन होऊ शकते.
श्री. सदाशिव टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील विरगळ या अनोख्या ग्रंथरूपी दालनातून इतिहासाच्या साधनांमध्ये मोलाची भर टाकली आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे गाढे अभ्यासक असलेल्या डॉ. गूंथर सांथायमर यांनी सर्वप्रथम संस्कृतीच्या या प्रकारच्या अपारंपरिक ऐतिहासिक साधनांकडे लक्ष वेधले होते. श्री. टेटविलकर यांनी त्यांची वाट पुसत आपल्या वर्षानुवर्षाच्या मेहनतीतून साकारलेला हा ग्रंथ ज्ञानपूर्ती आणि माहितीच्या डोहात पुढचे पाऊल टाकणारा आहे.



To purchase this book link in comment-

कसबे वाई‘वाई’ साधारण सतराव्या शतकापासून प्रकाशझोतात आलेले एक गाव. तसा या गावाचा इतिहास खूप जुना.अगदी ज्ञात इतिहास म्हणला...
02/01/2026

कसबे वाई
‘वाई’ साधारण सतराव्या शतकापासून प्रकाशझोतात आलेले एक गाव. तसा या गावाचा इतिहास खूप जुना.अगदी ज्ञात इतिहास म्हणला तरी इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत गावाचे संदर्भ सापडतात.गेल्या दोन सहस्त्रकांमध्ये अनेक निरनिराळ्या राजवटींनी वाईच्या ऐतिहासिक वाटचालीत भर घातलेली आहे. साधारण सतराव्या/अठराव्या शतकापासून वाईच्या सांस्कृतिक वैभवाला सुंदर असे कोंदण करण्यात आले.महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून वाई उदयास आले ते याच काळात. इतिहास पटलावर निरनिराळ्या काळात वाई शहराची बलस्थाने अधोरेखित झालेली दिसतात. या हजार दोन हजार वर्षांमध्ये बदलत गेलेली वाईची संस्कृती,कला,नगररचना,इथला व्यापारउदीम या सगळ्याचा ससंदर्भ मागोवा घेण्याचा प्रयत्न लेखक आदित्य चौंडे यांनी कसबे वाई या पुस्तकात घेतलेला आहे.



To purchase this book link in comment-

सह्याद्री बुक्सच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! !!
01/01/2026

सह्याद्री बुक्सच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! !!

वनस्पती रचनाशास्त्रवनस्पती रचनाशास्त्र तथा plant morphology ही आधुनिक वनस्पतीशास्त्राची सर्वाधिक जुनी शाखा आहे.  तिचा उग...
30/12/2025

वनस्पती रचनाशास्त्र
वनस्पती रचनाशास्त्र तथा plant morphology ही आधुनिक वनस्पतीशास्त्राची सर्वाधिक जुनी शाखा आहे. तिचा उगम वेदांमध्ये, विशेषतः अर्थवेदात आढळतो. ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल याच्या लिखाणातही प्राथमिक रचनाशास्त्र आढळून येते. रचनाशास्त्राच्या दोन शाखा आहेत बाह्यरचनाशास्त्र (External morphology ) आणि अंतरारचनाशास्त्र (Internal morphology or anatomy). त्यापैकी वर्गीकरणशास्त्रासाठी आणि सामान्य माणसांना आवश्यक आणि महत्त्वाची शाखा आहे बाह्यरचनाशास्त्र. श्री. द. महाजन तथा बापू यांनी रचनाशास्त्राचे हे पुस्तक लिहून मराठीत वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्यांची, वनस्पतीप्रेमींची फार मोठी सोय केलेली आहे.
To purchase this book link in comment-


वॉरन हॅस्टिंग्ज हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल असलेला वॉरन हॅस्टिंग्ज हा माणूस अतिशय प्रामाणिक, चारित्र्यवान प्रशासक ह...
25/12/2025

वॉरन हॅस्टिंग्ज
हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल असलेला वॉरन हॅस्टिंग्ज हा माणूस अतिशय प्रामाणिक, चारित्र्यवान प्रशासक होता. गव्हर्नर असताना त्याने बंगालच्या राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. त्याला भारतीयांविषयी खास आपुलकी होती. त्याने भगवद्‌गीतेचे इंग्रजीत भाषांतर करवून घेतले आणि त्याला छान प्रस्तावना लिहिली. एका झुंजार राज्यकर्त्याची आणि कुशल प्रशासकाची ही कहाणी लेखक अरविंद जोग यांनी मराठी वाचकांसमोर आणली आहे.
To purchase this book link in comment-

निसर्गक्षण निसर्ग अभ्यासक राम मोने यांनी कोणत्याही मदतीशिवाय कासवांच्या नवजात पिल्लांचे किनाऱ्यावर प्रकट होणे, गरुडाच्या...
22/12/2025

निसर्गक्षण
निसर्ग अभ्यासक राम मोने यांनी कोणत्याही मदतीशिवाय कासवांच्या नवजात पिल्लांचे किनाऱ्यावर प्रकट होणे, गरुडाच्या पिल्लाने अथांग आकाशात प्रथमच भरारी घेणे अशा वेगवेगळ्या निसर्गक्षणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न निसर्गक्षण या पुस्तकात केला आहे.
To purchase this book link in comment-

01/12/2025

Address

Dahanukar Colony, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Books posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahyadri Books:

Share

Category