03/05/2021
60 वर्षीय आईने घरगुती उपचाराने केली कोरोना वर मात
HRCT Score - 19
Oxygen Level - 70 - 88
माझी आई - सुमन पवार वय - 60
आई बहिणी कडे राहत होती दाजी कोविड + निघाले आणि त्यात आईची तब्येत पण बिघडली होती. आईची टेस्ट केली नाही कारण 4 दिवस बंद होती पण HRCT केली, तर; स्कोर निघाला 19. डॉक्टर म्हणाले आॅक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर पण लागेल. आम्ही सर्व जण खुप घाबरलो होतो. मग शोधाशोध सुरू झाली आॅक्सिजन बेड मिळवण्यासाठी. भाऊ मंगेशने काही जणांना फोन केले, पत्नी वैष्णवी ने आमचे मोठे मेव्हणे राम भाऊ यांना फोन केला व बेड पहायला सांगितला. त्यांनी पण काही मिनिटांतच बेड उपलब्ध केला. पण बाहेरील परिस्थिती लक्षात आणून दिली व सांगितले की जर तुमचा आयुर्वेदीक उपचारांवर विश्वास असेल तर घरीच उपचार घेण्यास सांगितले. आणि नशीब च्या पुढे काहीही नाही हे सांगितले शिवाय मी तुमच्या पाठीशी आहे असे खंबीरपणे सांगितले. आम्हाला खूप आधार वाटला व बाकी सर्वंच्या विरोधात जाऊन घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. लक्षणं काहीच जाणवत नव्हते. मला बाहेरील दवाखान्यांची परिस्थिती माहिती झाली. आॅक्सिजन बेड उपलब्ध नाही, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही आणि रेमडेसिवीर ही उपलब्ध नाही तर दवाखान्यात जावुन करणार काय? व शिवाय आईला गेल्या 15 वर्षांपासून सांधेदुखी च्या गोळ्या चालू होत्या, त्यामुळे ही आम्हाला रेमडेसिवीर चे दुष्परिणाम होऊ शकतो अशी भीती वाटत होती. आम्ही घरीच उपचार घेण्याचा जड निर्णय घेतला. सुरवातीला दवाखान्यात दाखल करण्यासाठी नातेवाईक व मित्र मंडळी कडुन खूप दबाव होता. पहिले 4 - 5 दिवस खूप त्रास झाला. पण नंतर सर्व नॉर्मल होत गेले. आणि 17 दिवसांनंतर टेस्ट निगेटिव्ह आली.
आम्ही घेतलेला उपचार
1 - नॅचरल वर्ल्ड - पंचगव्य
अमृत धारा = पहिले 2 दिवस आम्ही 4 - 4 वेळा 2 - 2 थेंब घेऊन 1 कप कोमट पाण्यात पिण्यासाठी वापरले. शिवाय गरम पाण्यात 2 - 2 थेंब टाकून वाफ घेण्यासाठी वापरले. त्यामुळे सर्दी व खोकला कमी होण्यास मदत झाली. कफ कमी होऊन, आॅक्सिजन लेवल वाढण्यास मदत झाली.
तुळस गोधन अर्क = रोज 1 चमचा कोमट पाण्यात 2 वेळा घेतले. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत गेली. आॅक्सिजन लेवल वाढण्यास मदत झाली.
2 - लाकडी घाणा मोहरी तेल = पहिले 2 दिवस कोमट मोहरी तेलाचा, ओवा व लसूण घालून छातीला व पाठीला लावले. आणि चमत्कार सर्व कफ जुलाब व उलट्या द्वारे निघून गेला.
सर्दी व खोकला तर कमीच होता पण अशक्तपणा हा जास्त होता आणि आॅक्सिजन लेवल कमी होती.
अशक्तपणा आहे म्हणून घाबरून जाऊ नये 🙏
4 - आहार = पहिले 2 दिवस तर फक्त लिक्विड च दिले.
सकाळी - पिठवणी ( बाजरीचे पीठ व गुळाची पेज), पातळ शिरा, गिर गाईचे दूध
दुपारी - लिंबू पाणी, ग्लुकाॅन डी, इतर ज्युस, पातळ मुगाच्या डाळीचे वरण.
संध्याकाळी - गिर गाईचे दूध हळद, गुळ आणि न्यूट्रिलाईट प्रोटिन पावडर घालून.
अधून मधून
नंतर
सकाळी नाष्टा आणि दुपारी जेवण. मधुन मधुन लिंबू पाणी, ज्यूस, काढा चालूच होते
पण रात्री फक्त दूध दिले. रात्री जेवण दिले नाही. देण्याचा आग्रह ही करु नये. कारण मग आपली रोगप्रतिकारक शक्ती आजारा सोबत लढण्यासाठी काम करते नाही तर ती जेवण पचवण्याचेच काम करेल.
5 - खजुर = अशक्तपणा घालवण्यासाठी 2 - 3 खजुर दिवसभरात
6 - न्यूट्रिलाईट प्रोटिन पावडर - अशक्तपणा घालवण्यासाठी व आॅक्सिजन लेवल वाढण्यासाठी खूप खूप मदत झाली.
7 - मोकळी हवा = एकाच रुम मध्ये असल्याने मास्क घातला नाही. खिडक्या उघड्या ठेवल्याने शुद्ध हवा मिळाली व आॅक्सिजन लेवल वाढत गेली.
8 - मोबाईल व न्युज चॅनल पासून लांब - बाहेर खुप निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत शिवाय खूप भीती चे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा यापासून लांबच राहिलो.
आपला मेंदू इतका ताकदवान आहे की कोणत्याही असलेल्या आजारातून बाहेर काढू शकतो व नसलेला आजार ही निर्माण करु शकतो, फक्त त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
9 - प्रोन व्हेंटिलेशन = सोप्या भाषेत दिवसभरात काही वेळा पालथे झोपणे. डोके, पोट व पायाखाली उशी घेऊन झोपणे. त्यामुळे आॅक्सिजन लेवल वाढण्यास मदत झाली.
10 - अॅलोपॅथी मधील = Azithromycin 500mg व B-MOX 500mg या 2 गोळ्या, 2 वेळा 3 दिवस फॅमिली डॉक्टर च्या मदतीने दिले. त्यामुळे मनामधील थोडी भीती ही निघून जायला मदत झाली.
*11 - सर्वात महत्त्वाचे मागील घेत असलेल्या गोळ्या* - आईला सांधेदुखी च्या काही गोळ्या चालू होत्या त्या बंद होऊ दिल्या नाहीत. फक्त 1 च दिवस आम्ही विसरलो तर शरीर प्रतिसाद देत नव्हते आम्ही घाबरलो होतो पण गोळ्या दिल्यानंतर सर्व ठिक झाले.
हा असा उपचार करून आम्ही कोरोना या आजारावर मात करण्यात यशस्वी झालो. हा अनुभव सांगण मला आवश्यक वाटले करण आपणास ही सकारात्मक उर्जा मिळू शकेल 🙏
हा जड निर्णय घेण्यात व यशस्वी करण्यात मला काही व्यक्तींचे खुप अनमोल साथ व मार्गदर्शन लाभले. त्यांचे खूप खूप आभार 🙏
1 - राम भाऊ गावडे - मेव्हणे
2 - सतीश खैरै - नॅचरल वर्ल्ड
3 - अशोक अदक - न्यूट्रिलाईट
4 - सोना केरकर - N.I.C.E.
आणि माझी पत्नी वैष्णवी व भाऊ मंगेश, प्रियांका, मुलगा तनिष्क, बहीण, दाजी, सासू - सासरे, सर्व मेव्हण्या व साडू बंधू आणि मित्र मंडळी यांच्या शिवाय मी अपूर्णच आहे. यांचे खूप खूप आभार.
दिपक पवार - 9158321919