Deccan Book Gallery

Deccan Book Gallery we lives for books

लॉर्ड्स ऑफ द अर्थ अॅण्ड सी l अनिरुद्ध कनिसेट्टीभाषांतर रमा हर्डीकर-सखदेवकिंमत l 500/-संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l (gpay -...
19/01/2026

लॉर्ड्स ऑफ द अर्थ अॅण्ड सी l अनिरुद्ध कनिसेट्टी
भाषांतर रमा हर्डीकर-सखदेव
किंमत l 500/-
संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l (gpay - 9689254633)
-----------------------------------------------

चोळांचं महान साम्राज्य अनपेक्षितरीत्या निर्माण झालेलं होतं. कावेरीच्या गाळाच्या मैदानात इ.स. सुमारे ८५०च्या आसपास अचानक त्याची उत्पत्ती झाली, तोपर्यंत शतकानुशतकं या प्रदेशात स्वयंशासित ग्रामपंचायतीच होत्या. इथूनच चोळांनी एक विशाल साम्राज्य स्थापन केलं. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशातील साम्राज्य हे भारतीय उपखंडातील सर्वांत प्रवळ सत्ता बनण्याची ही पहिली आणि एकमेव वेळ होती; हे स्थान तोवर सहसा दख्खन किंवा उत्तर भारतातील साम्राज्यांनीच राखलेलं होतं, चोळ राजे जितके सृजनशील आणि कल्पनाशील होते तितकेच ते अनपेक्षित कृती करणारेही होते. त्यांनी इजिप्तच्या पिरॅमिडखालोखाल पृथ्वीवरील सर्वात उंच, स्वतंत्रपणे उभी असलेली भव्य मंदिर बांधली. चोळ राण्यांनी नटराजासारखे देव, आणि देवासमोर तमिळ कवितांचे गायन असे उपासनेचे नवीन प्रकार लोकप्रिय केले. त्याचबरोचर, चोळ हे आश्चर्यकारकपणे पाडसी होते. त्यांनी केवळ शक्तिशाली दख्खन आणि उत्तर भारतावरच नव्हे; तर आग्रेय आशिया आणि श्रीलंकेवरही हल्ले केले. हे राजघराणं इतके प्रभावशाली आणि आज इतकं लोकप्रिय असूनही त्याची खरी ऐतिहासिक कामगिरी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विसरली गेली हेही एक आश्चर्यच कारण त्या सगळ्या गोष्टी मिथक आणि दंतकथेत विरून गेल्या.

या पुस्तकात पुरस्कार विजेते इतिहासकार अनिरुद्ध कनिसेट्टी चोळांच्या या जगाला जिवंत करतात. केवळ राजे आणि राण्या, सेनापती आणि 'सेवा लवाजम्या तल्या खिया यांच्याविषयी लेखक आपल्याला सांगत नाही, तर सर्वसामान्य म्हणजे लहान लोकांच्या कथादेखील सांगतात, ज्यांची आयुष्यं मोठमोठ्या घटनांमुळे हेलकावे खायची तर कधी उध्वस्त व्हायची. तमिळ किनाऱ्यावरून आग्रेय आशिया आणि चीनकडे जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरचं जीवन कसं असायचं? मंदिरांमध्ये भक्तांना आणि युद्धाच्या वेळी सैनिकांना कोणत्या प्रकारचं जेवण दिलं जायचं? रागाच्या भरात जापल्या भावाची हत्या करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्याचं पुढे काय झालं? एक श्रीमंत घराण्यातली खी डोक्यावर लिंबू ठेवून सती का गेली? हजारो शिलालेख आणि शेकडो दुय्यम सोतांवर आधारित, सखोल संशोधन केलेलं हे पुस्तका केवळ राजे आणि राण्यांच्या चमकदार कथा आपल्याला सांगत नाही, तर ते आपल्याला हजारेक वर्षांपूर्वीच्या शेतकरी वस्त्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या प्रवेशद्वाराचंही काम करतं. या पुस्तकात कनिमेट्टी तथ्य आणि काल्पनिक गोष्टी यांना वेगळं करण्याचं महत्त्वाचं काम करतात, आणि आपल्याला मानवी इतिहासातील एक असामान्य अशी कहाणी सांगतात.

जहाँआरा lसुकुमारनशाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदारअनुवाद : नेहा काळेकिंमत l 250 /- (पोस्टेज 40/-) संपर्क l ड...
06/01/2026

जहाँआरा lसुकुमारन
शाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदार
अनुवाद : नेहा काळे
किंमत l 250 /- (पोस्टेज 40/-)
संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l (gpay 9689254633)
--------------------------------
शाहजहानची मुलगी जहाँआरा हिच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. ती सर्व मुघल शाहजाद्यांमध्ये सर्वांत विद्वान होती. कुमारवयातही ती तिच्या सम्राट वडिलांना राज्यकारभार आणि मुत्सद्दीपणाने सल्ले देत असे.
आधी आपला पती जहाँगीर आणि नंतर औरंगजेब यांचे कान भरून त्यांना एखाद्या कठपुतळीप्रमाणे नाचवणारी शाहजहानची धूर्त सावत्र आई नूरमहल हिची कारस्थाने हाणून पाडताना जहाँआराने सातत्याने शाहजहान, दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले. पर्शियन, संस्कृत आणि इतर अनेक भाषांमध्ये पारंगत असलेल्या जहाँआराने फक्त कुराणच नाही, तर वेद आणि पुराणांचाही अभ्यास केला होता.

एके काळी बंगालच्या उपसागरात सागरी व्यापारासाठी सर्वाधिक जहाजांची मालकीण म्हणून तिची ख्याती होती.
तथापि, तिचे आयुष्यही प्रचंड भावनिक उलथापालथीचे होते. राजपूत राजा छत्रसालच्या प्रेमात ती खोलवर बुडाली होती; पण तिचे आजोबा, सम्राट अकबर यांनी नियम घालून दिला होता की, मुघल राजघराण्यात जन्मलेल्या स्त्रियांना प्रियकर असता कामा नये, तसेच त्यांनी विवाहदेखील करता कामा नये. तिने एकाकी राहून आपल्या वडिलांची सेवा करत आणि पानिपत नावाच्या एका प्रामाणिक हिजड्याच्या मैत्रीवर अवलंबून राहूनच आयुष्य व्यतीत केले. सुकुमार यांची जहाँआरा आपल्याला अशी गोष्ट सांगते की, जिचा साक्षीदार पानिपत नावाचा हिजडा आहे. तिच्या वैयक्तिक रोजनिशीतून आपल्याला तिच्या भावांच्या संघर्षादरम्यान तिचे आयुष्य कसे नरकाच्या आगीत होरपळून निघत होते, याचे स्पष्ट चित्रण वाचायला मिळते.

मिथकांपासून विज्ञानापर्यंत (ब्रह्मांडाच्या विकासाची बदलती कहाणी)लेखक l गौहर रझाअनुवाद : विक्रामकिंमत l 300/- (पोस्टेज -4...
27/12/2025

मिथकांपासून विज्ञानापर्यंत (ब्रह्मांडाच्या विकासाची बदलती कहाणी)
लेखक l गौहर रझा
अनुवाद : विक्राम
किंमत l 300/- (पोस्टेज -40/-)
संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l 9689254633
---------------------------------
विज्ञान आणि धर्माच्या मध्ये 'वास्तविकतेची' सीमारेषा
विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे विरोधक आहेत की एकमेकांना पूरक ?
एक अत्यंत धार्मिक व्यक्ती, चांगली वैज्ञानिक असू शकते का ?
विज्ञान हे लोकांना धर्मभ्रष्ट करतं का ?
एखाद्या अत्यंत धार्मिक समाजात, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू शकतो का ?

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक असलेल्या, कवीमनाच्या गौहर रझा ह्यांच्यासमोरसुद्धा हे प्रश्न अनेकदा उपस्थित झाले. कधी कुंभमेळ्याच्या गर्दीत, तर कधी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना. ह्यांपैकी काही प्रश्न आपल्याला विज्ञानाकडे आणि काही धर्माकडे घेऊन जातात. ह्या प्रश्नांची उत्तरं एका कवीमनाच्या वैज्ञानिकाने शोधायला सुरुवात केली, तेव्हा मिथकं आणि कहाण्यांबरोबरच धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञानाचे अनेक पैलू पुढे आले.

हे पुस्तक ब्रह्मांडाच्या आणि जीवसृष्टीच्या विकासाची बदलती कहाणी सांगताना 'विज्ञाना'ची व्याख्या करण्याचा एक प्रयत्न आहे. इतिहासाची पानं उलटत-उलटत यात सांगितलं गेलंय, की विज्ञान आणि धर्म ह्यांच्यामध्ये 'वास्तविकते'ची सीमारेषा आखणं आवश्यक आहे. ही गोष्टसुद्धा पावला-पावलांवर स्पष्ट होत जाते, की तार्किक दृष्टी, वैज्ञानिक पद्धती आणि मानवी संवेदना या परस्परपूरकच आहेत.

देशीवाद l भालचंद्र नेमाडे  भाषांतर l प्रशांत धांडे किंमत l 260/-संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l 9689254633१९८३ साली रा. भालच...
26/12/2025

देशीवाद l भालचंद्र नेमाडे
भाषांतर l प्रशांत धांडे
किंमत l 260/-
संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l 9689254633

१९८३ साली रा. भालचंद्र नेमाडेंनी 'वाङ्‌मयातील देशीयता' या निबंधाची मांडणी केल्यानंतर आजपावेतो देशीवादावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट बरीच चर्चा झाली आहे. बहुतांश वेळा ही चर्चा नकारात्मक आणि प्रतिक्रियात्मक झालेली दिसते. स्वातंत्र्योत्तर काळापासून एतद्देशीय अकादमिक समीक्षा ही पश्चिमधार्जिणी राहिल्यामुळे बहुतांश आक्षेप त्याच छायेखाली झाल्याचं दिसतं. देशीवादाला कुणी पाश्चात्त्यविरोधी, कुणी पुरोगामी, तर कुणी प्रतिगामी ठरवून आपापल्या मापदंडांनुसार समीक्षकांनी त्याचे आकलन करून घेतले. मराठी भाषेतील समीक्षक देशीवादाबाबत साशंक राहिल्याचे दिसले, तरी देशपातळीवरील परिसंवाद, वाद-चर्चा, व्याख्याने, वाङ्मयीन नियतकालिके आणि समीक्षक यांनी देशीवादाचे स्वागतच केल्याचे दिसून येते.

म्हणूनच मराठी साहित्य-संस्कृतीत नेहमी हिरिरीने चर्चिला गेलेला नेमाडेंचा देशीवादाचा मूळ विचार जिज्ञासू मराठी वाचकांना आणि अभ्यासकांना आकळून घेता यावा, या हेतूने केलेलं त्यांच्या निबंधांचं भाषांतर म्हणजे हे पुस्तक, जे साहित्य आणि समीक्षा यांच्या पलीकडे जाऊन संस्कृतीच्या विविध अंगांना स्पर्श करतं.

चंगेज खान l आधुनिक जगाची निर्मिती करणारा सम्राटलेखक l जॅक वेदरफोर्डअनुवाद l मुकुंद वझेकिंमत l 400/- (पोस्टेज - 45/-)संपर...
13/11/2025

चंगेज खान l आधुनिक जगाची निर्मिती करणारा सम्राट
लेखक l जॅक वेदरफोर्ड
अनुवाद l मुकुंद वझे
किंमत l 400/- (पोस्टेज - 45/-)
संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l 9689254633
------------------------------------------------------------
चंगेज खान ह्याने मागे ठेवलेले साम्राज्य इतके सुस्थिर होते की, ते पुढील दीडशे वर्षे वृद्धिंगत होत राहिले. त्या साम्राज्याच्या विलयानंतर त्याचे वंशज अनेक छोट्या प्रदेशांवर आणि मोठ्या राष्ट्रांबर राज्य करत राहिले. रशिया, तुर्कस्तान, हिंदुस्थान ते चीन आणि पर्शिया, त्यांनी खान, सम्म्राट, सुलतान, राजा, शाह, अमीर आणि दलाई लामा अशी विविध प्रकारची उपाधिनामे धारण केली. त्याच्या साम्राज्याचे अवशेष त्यांच्या वंशजांच्या सत्तेखाली सात शतके राहिले. मोगल म्हणून त्यांच्यातल्या काहींनी १८५७पर्यंत हिंदुस्थानवर राज्य केले. त्या वर्षी ब्रिटिशांनी सम्राट बहादूर शाह जफर याला पदभ्राट केले आणि त्याच्या दोन मुलांची आणि नातवाची डोकी उडवली. चंगेज खान याच्या वंशातील अखेरचा राज्यकर्ता म्हणजे बुखारा प्रांताचा अमीर अलीम खान, उझबेकिस्तानमध्ये १९२०पर्यंत सत्तेबर राहिला. त्या साली रशियन राज्यक्रांतीच्या वाढत्या बळापुढे तो आपल्या पदावरून दूर झाला.

Deccan Book Gallery #चंगेजखान

महाड l रोज नित छेडला जाणारा धर्मसंगरलेखक l बोज्जा थारकमअनुवाद l राहुल पगारेकिंमत पोस्टेजसह l 210/-संपर्क l डेक्कन बुक गॅ...
24/09/2025

महाड l रोज नित छेडला जाणारा धर्मसंगर
लेखक l बोज्जा थारकम
अनुवाद l राहुल पगारे

किंमत पोस्टेजसह l 210/-
संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l 096892 54633

बाबासाहेबांचा विरोध हा ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला नव्हता, तर अशा खोट्या सोंगांना होता. हा नैतिक फरक जात-अंध इतिहासकार आणि संशोधक अभ्यासकांना लक्षात घेता आला नाही.

महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते, त्यावर भरपूर चर्चा होते. परंतु महाड सत्याग्रहाबद्दल मात्र तशी चर्चा होत नाही किंवा त्याकडे सम्यक दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. अस्पृश्यांच्या गावकुसाबाहेरच्या वस्त्यांसारखेच त्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहासही कोपऱ्यात ठेवून दुर्लक्षित केला गेला. प्रस्तुत लेखक बोज्जा थरकम यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे. काहींना फक्त तुलना वाटेल, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी दांडी यात्रा आणि महाड सत्याग्रह यांची तुलना केली नाही. त्याऐवजी दोन्ही आंदोलनांमधील नैतिक फरक, त्यावेळच्या सामाजिक आव्हाने आणि दोन नेत्यांनी ती कशी हाताळली यावर सखोल चर्चा घडवून आणली आहे.

- राहुल पगारे

उर्दूच्या जन्माची कहाणी l सरफराज अहमदकिंमत l 220/-प्रकाशनपूर्व सवलतीत - 180/-संपर्क l दख्खन पब्लिकेशन, पुणे (gpay - 9689...
05/09/2025

उर्दूच्या जन्माची कहाणी l सरफराज अहमद
किंमत l 220/-
प्रकाशनपूर्व सवलतीत - 180/-
संपर्क l दख्खन पब्लिकेशन, पुणे (gpay - 9689254633)
------------------------------------------------------
भाषा ही संस्कृतीची वाहक असते. मानवी जीवनाला दिशा आणि गतिशीलता प्रदान करण्यात भाषा महत्वाची भूमिका वठवते. भाषा सांस्कृतिक असते, तशी ती राजकीय असते. दुसऱ्या बाजूला तिचं अस्तित्व सामाजिक देखील आहे. भाषा ज्ञानाच्या निर्मितीचे माध्यम आहे. त्यामुळे वेचिक ज्ञानाची निर्मिती करुन सत्तेला आव्हानही देते आणि संरक्षणही प्रदान करते. भाषा तिला बोलणाऱ्या राजकीय समूहाच्या प्रतिनिधित्वाची निदर्शक असते. त्यामुळेच सत्तेतील बदल, जय, पराजय यांचा थेट परिणाम भाषेवर होतो. संस्कृती भाषेचा श्वास असला तरी भाषेचे भवितव्य राजकारणातून निर्धारित होत असते. त्यामुळेच भारतासारख्या बहुभाषिक देशात भाषेवरुन अनेक हिंसक संघर्ष झाले. भाषेमुळे सत्ता संपल्या आणि उदयासदेखील आल्या. तशा सत्तेमुळे भाषा संपल्या आणि उदयासही आल्या. प्रत्येक समाजाची, प्रदेशाची, संस्कृतीची आणि सत्तेचीदेखील भाषा असते. भाषा ही जशी व्यवहाराची असते, तशी ती ज्ञानाच्या निर्मितीचे माध्यमही असते. सत्ता नेहमी आपल्या समर्थनार्थ ठराविक अथवा सीमित ज्ञानाची निर्मिती करत असतात. सत्तेतून पदच्युत वर्गाच्या भाषा आणि ज्ञानाला संपवण्याचे प्रयत्न अनेक सत्तांनी केले आहेत. अथवा पूर्वसत्ताधारी किंवा बहुसंख्यांकांच्या त्या भाषा अथवा ज्ञानामध्ये आपले प्रतिनिधित्व निर्माण करण्याचेही उद्योग काही सत्तांनी करुन पाहिले आहेत. पण, असा प्रकार अपवादानेच घडला आहे. सत्तेने भाषेवर कुऱ्हाड चालवण्याचे प्रकार मात्र इतिहासात नेहमीचे होते आणि आहेत, आणि आज सत्तांधांच्या निशाण्यावर उर्दू आहे."

आपली प्रत आजच नोंदवा...
05/09/2025

आपली प्रत आजच नोंदवा...

सिंधू ते बुद्धः अज्ञात इतिहासाचा शोधलेखक l रवींद्र इंगळे चावरेकरकिंमत l 1500/- ( सवलतीत पोस्टेजसह - 1299/- )संपर्क l डेक...
14/11/2024

सिंधू ते बुद्धः अज्ञात इतिहासाचा शोध
लेखक l रवींद्र इंगळे चावरेकर
किंमत l 1500/- ( सवलतीत पोस्टेजसह - 1299/- )
संपर्क l डेक्कन बुक गॅलरी l 9922846844
--------------------------------------------------
कोणत्याही काळात खोटा इतिहास खऱ्या इतिहासाचा निघृणपणे गळा घोटत असतो. यातून खोटा इतिहास नेहमीच एक विकृत इतिहास स्थापित करतो. जगभरात ही प्रक्रिया घडलेली दिसते; परंतु भारतात तिचे प्राबल्य अधिक आहे. ज्ञानार्जनाचे अधिकार आणि इतिहासलेखनाची साधने वैदिकांच्या ताब्यात असण्याची केवढी मोठी किंमत समाजाला चुकवावी लागली, हे आता हळूहळू समाजाला कळू लागले आहे; कारण वास्तव इतिहासाची मांडणी समाजाच्या विविध स्तरातून होऊ लागली आणि लोकही खरा इतिहास वाचू लागले आहेत. रवींद्र इंगळे चावरेकरांनी 'सिंधू ते बुद्धः अज्ञात इतिहासाचा शोध' या ग्रंथात वैदिकांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी, ती अबाधित ठेवण्यासाठी इतिहासात जे जे घोळ घालून ठेवले आहेत त्याला अधोरेखित करण्याबरोबरच दडपल्या गेलेल्या इतिहासाची फेरमांडणी केली आहे. ही मांडणी इतिहासाकडे पाहण्याची एक तर्काधिष्ठित दृष्टी देते. आजचा उपलब्ध इतिहास वेद, पुराणादी वैदिक धार्मिक ग्रंथांना प्रधान मानून, सामान्यजनांना अज्ञानात ठेवून, भ्रम निर्माण करून, पाप-पुण्यादी भयाची धूळ डोळ्यांमध्ये फेकून थोपला गेला आहे. त्या सगळ्या वर्चस्ववादी इतिहासाला तोंड फोडण्याचे काम हा ग्रंथ करतो. मेधयज्ञवादी वैदिक आणि ऊर्जा ब्रह्मवादी श्रमण या दोन विचारधारांच्या संघर्षातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अधिसत्तेसंबंधीचे विविध पैलू उलगडून दाखवण्याबरोवर इथल्या मूळच्या मानवतावादी श्रमणी विचारधारेला विद्रुप करून वैदिकांनी कलम केलेल्या वर्णवादी व्यवस्थेची संदर्भपूर्ण चर्चा हा ग्रंथ करतो. वैदिकांनी श्रेणीबद्ध खाणेसुमारी करत श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भेरेषा आखून भारतीय समाजातील सौहार्दाचा गळा घोटला, हे नमूद करतानाच भारतीय संस्कृतीच्या मानवतावादी गाभातत्त्वांचे संसुचनही करतो. आज भारतीय समाज भीषण अशा अस्मितासंघर्षातून जातो आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक बुरीणत्व मिरवणारे सत्ताधारी या अस्मितांना चिथावणी देऊन समाजाचे मानसिक स्थैर्य बिघडवत आहेत. या पार्श्वभूमीवर 'सिंधू ते बुद्धः अज्ञात इतिहासाचा शोध' हा ग्रंथ प्रकाशित

होण्याला एक विशिष्ट असा अर्थ प्राप्त होतो.

इरफान खान आकर्षक डोळे, भव्य उपस्थिती आणि प्रख्यात फिल्मोग्राफी असलेला सौम्य स्वप्न पाहणारा आहे. आपल्यापैकी बहुतेक जण त्य...
16/07/2024

इरफान खान आकर्षक डोळे, भव्य उपस्थिती आणि प्रख्यात फिल्मोग्राफी असलेला सौम्य स्वप्न पाहणारा आहे. आपल्यापैकी बहुतेक जण त्या माणसाला त्याने साकारलेल्या पात्रांद्वारेच ओळखतात: हैदरमधील रूहदार, नामांकित चित्रपटातील मकबूल, पिकूमधील राणा, द लंचबॉक्समधील साजन आणि अर्थातच, द नेमसेकमधील अशोक. आज या पात्रांनी त्याला जगभरात ओळखले जाणारे नाव बनवले आहे.
वैयक्तिक मुलाखतींमधून काढलेले आणि अनेक आवाजांतून सांगितलेले असीम छाब्रा इरफानचे वैयक्तिक आणि कलात्मक जीवन त्याच्या अनेक छटांमध्ये शोधतात. तपशिलाने समृद्ध आणि किस्से भरलेले, हे अभिनेत्याचे जीवन आणि कार्य यावर एक आकर्षक देखावा आहे जो राजस्थानमधील एका छोट्या घरातून सुरू होतो आणि हॉलीवूडमधील बिलबोर्डवरून खाली टक लावून पाहत असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर पोहोचतो. सिनेमा काय करू शकतो हे भारत आणि जगाला दाखवून देणाऱ्या त्यांच्या काही उत्कृष्ट कामगिरीचा शोध यात आहे. तथापि, या कथेच्या केंद्रस्थानी एक माणूस आहे, कदाचित त्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनयाच्या कलेबद्दलची त्याची आवड आणि असामान्य पात्रांबद्दलचे त्याचे प्रेम.

Address

411001
Pune
411001

Telephone

+919922846844

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deccan Book Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deccan Book Gallery:

Share

Category