03/07/2023
1) स्टार्टअप करणारच उद्योजक होणारच मी
हल्ली 'स्टार्टअप' हा जणू परवलीचा शब्द बनला आहे. पण स्टार्टअप म्हणजे नेमके काय, कोण व कशा प्रकारे स्टार्टअप सुरु करू शकतो ,हे डॉ. विठ्ठल इंदिरा व्यकंटेश कामत यांनी 'स्टार्टअप करणारच मी, उद्योजक होणारच मी' मधून सर्वसामन्यांसमोर सोप्या भाषेत मांडले आहे . १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते ८२ वर्षाच्या ज्येष्ठ विद्यार्थी वाचक गटासाठी हे पुस्तक असल्याने लेखकाने यात नमूद केले आहे . त्यानुसार लेखनाची भाषाशैलीही दिलखुलास आहे . विठ्ठल कामत स्वतः उद्योजक कसे झाले , हे उलगडतानाच स्टार्टअप करताना स्वतःचे मूल्यमापन , आत्मपरीक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले आहेत. संतुलित विचारशक्ती , प्रबळ मनःशक्ती आणि दूरदृष्टी हा पाया धरून त्याला व्यवहारीकतेची जोड दिल्यास आपण आयुष्यात यशस्वी उद्योजक होणारच , हा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. स्टार्टअप करताना बदलाचा स्वेच्छेने स्वीकार करणे , स्टार्टअपपूर्वीची तयारी , स्टार्टअप आणि उद्योगातील फरक , श्रद्धा , आत्मविश्वास बाळगणे , स्टार्टअप सुरु झाल्यावर त्याचे उद्योगात रुपांतर करण्यासाठी तयारी व त्यानंतर यशस्वी उद्योजकासाठीचे तंत्र यातून समजावून सांगितले आहे.
Language : मराठी
Pages : 272
पुस्तक किंमत : 300/- रू
2) उद्योजक की यशस्वी उद्योजक
प्रत्येक तरुणाचं/ व्यावसायिकाचं यशस्वी व्यावसायिक (उद्योजक) होण्याचं लक्ष्य/स्वप्न असतं. त्यासाठी ते प्रचंड कष्टही करतात, परंतु प्रचंड कष्ट करूनही ते फार मोठी झेप घेऊ शकत नाहीत. याचं कारण काय हे उद्योजक की यशस्वी उद्योजक पुस्तक सांगतं. काही व्यावसायिकांसाठी व्यवसाय हा चक्रव्यूह असतो, बऱ्याच वेळा ते चक्रव्यूहात अडकत जातात. पण जो व्यावसायिक हा चक्रव्यूह भेदून बाहेर येतो तोच यशस्वी उद्योजक होतो. उद्योजक की यशस्वी उद्योजक हे पुस्तक चक्रव्यूह भेदून यशस्वी उद्योजक कसं होता येईल हे सांगतं. या पुस्तकात दिलेली सूत्रे जर आपल्या व्यवसायात वापरली तर व्यवसाय निश्चितच नवी उंची गाठेल. हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांना उपयोगी आहेच, त्याचबरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनाही मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील काही मुद्दे * आर यू प्रोफेशनल? * यशस्वी व्यवसायाची ११ सूत्रे * व्यावसायिक टॉप व्ह्यू * ६४ घरं फिरण्याची कला * प्रॉडक्टिव्ह प्रॉडक्ट कसे ओळखाल? * बॉटल नेक * ब्रँड इमेज * व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत? * क्रायसेस मॅनेजमेंट * बुद्धिमत्तेतून व्यवसायवृद्धी * कठीण समयी टिकून राहण्याचं रहस्य * हायटेक, जंटलमन वसायिक बना * पैशाचे व्यवस्थापन कसे कराल? * व्यावसायिक यश टिकवायचे असेल तर... हे पुस्तक आपल्याला फक्त यशस्वी व्यावसायिक नाही तर कित्येक कुटुंबांसाठी आधारस्तंभ बनवते. तुमच्या मार्गदर्शनामुळे कित्येक तरुणांना दिशा मिळेल व भविष्यात तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्योजक बनायची ऊर्जा मिळेल.
Language : मराठी
Pages : 249
पुस्तक किंमत : 350/- रू
3) सेल्स सुपरस्टार
ब्रायन ट्रेसी हे जगातील विक्री विषयाचे उत्तम व्याख्याते, प्रशिक्षक तसेच सल्लागार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध क्षेत्रातील 250,000 लोकांना प्रशिक्षण दिलं आहे. ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या फाउंडेशनची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी साबण, ख्रिसमस ट्री सारख्या किरकोळ वस्तूंच्या विक्रीपासून ते मोठ्या आर्थिक गुंतवणुकीसाख्या विविध 22 प्रकारच्या व्यवसायांमध्ये विक्रेता म्हणून काम केलं आहे. अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी त्यांनी विक्री दल (सेल्स टीम) सुरू करून उत्तम कार्य केलं आहे. ब्रायन ट्रेसी यांनी ‘अतिशय प्रभावी सेल’ या विषयावरील ऑडीओ आणि व्हिडीओ कॅसेटची मालिका विकसित केली आहे. त्यांचं भाषांतर विविध 16 भाषांमध्ये झालं आहे. आज त्यांचा उपयोग विविध 23 देशातून होत आहे.
* सेल्समनच्या मनातील भीती व त्यावरील उपाय * सेल्सकॉल्सची प्रभावीपणे तयारी कशी करावी? * विक्रीक्षेत्रात यश मिळवण्याची सूत्रं * विक्रीसाठी आवश्यक संबंध निर्माण करण्यासाठी - रिलेशनशीप सेलिंग मॉडेल * प्रेझेंटेशन स्कील * सेलिंग करताना ग्राहकाकडून येणारे प्रश्न व त्यावरील उत्तरं * विक्री करताना वेळेचं आणि कामाचं नियोजन * सेल क्लोज कसा करावा?
Language : मराठी
Pages : 128
पुस्तक किंमत : 170/- रू
4) विक्री कौशल्य
या पुस्तकामध्ये सुब्रोतो बागची यांनी त्यांच्या कित्येक वर्षांचा विक्रीकौशल्याचा अनुभव शब्दरूपामध्ये मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी कित्येक उदाहरणांच्या माध्यमातून विक्री करण्याच्या विविध कल्पनांची ओळख करून दिली आहे. त्यांनी विक्री करताना आवश्यक असलेलं कौशल्य, त्यासाठीची साधनं आणि त्यामागची कला या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
* विक्री करताना खात्रीशीर यश कसे मिळवावे. * सातत्य आणि चिकाटीने विक्री कशी करावी. * कमी वेळेत जास्तीत जास्त विक्री कशी करावी. * आपल्या उत्पादनाचं महत्त्व ग्राहकाला कसं पटवून सांगावं. * वेळ घालवणार्या ग्राहकांच्या मागे न जाता योग्य ग्राहकांची निवड कशी करावी.
Language : मराठी
Pages : 144
पुस्तक किंमत : 195/- रू
प्रत्येक व्यावसायिक मित्रांनी नक्कीच वाचायलाच हवीत, अशी ही 4 "पुस्तके" महाराष्ट्रभरात सर्वत्र घरपोच मिळतील .
4 Books Combo Rs 899/- Only!
* वरील ४ ही "पुस्तके" घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून डायरेक्ट मेसेज करू शकता.👍
https://wa.me/919172001257/?text=4BusinessBooksCombo
डी.जी बुक्स (पुणे)
9172001257 (Whats App)
[email protected]
See less