Cart9

Cart9 Cart9 is multi vendor small scale industry for promoting business, social cause etc. you can login

cart9brand is designed and established to provided knowledge and services
simply cart9 means Culture + art + Revenue + Transport

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हार्दिक शुभेच्छा !
14/04/2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हार्दिक शुभेच्छा !

'रसिकराज'------------------------------------------------------------लाडू म्हणजे गोड बातमी! लाडू म्हणजे आई आजीची माया ! ...
25/03/2023

'रसिकराज'
------------------------------------------------------------

लाडू म्हणजे गोड बातमी! लाडू म्हणजे आई आजीची माया ! लाडू म्हणजे आठवणींचा ठेवा! तहानलाडू, भूकलाडू सुद्धा बापरे!! आपल्या संस्कृतीत लाडू इतकं महत्त्व क्वचितच एखाद्या पदार्थाला मिळालं असेल. सध्याच्या फास्ट फूड च्या काळातही प्रत्येकाच्या आवडीचा एक तरी लाडू असतोच.कोरोना काळात सकस व सात्विक खाण्याचे महत्त्व आपण जाणले.

मूळच्या पुणेकर असलेल्या, आता लग्नानंतर पनवेल येथे स्थायिक झालेल्या सौ. रसिका राजेश रेमाणे या पनवेलच्या उद्योजिका म्हणून नावारूपास येत आहेत. 'रसिकराज' या नावाने त्या प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बाळकडू त्यांना घरातून मिळाले.२००१ साली लग्नानंतर त्यांनी नोकरी केली.त्यानंतर त्यांनी आई स्नॅक्स कॉर्नर व LC Food द्वारे आपल्या व्यवसायाला सुरुवात केली.२०११ पासून त्यांनी रसिका अंतर्गत बेसन लाडू,रवा, डिंक, मेथी लाडू व दिवाळीत फराळ विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शेजारी, परिचितांना लाडू देण्यास सुरुवात केली. चांगली चव,उत्तम पॅकिंग, तत्पर सेवा व गुणवत्तेच्या जोरावर त्यांच्या लाडू ना मागणी वाढू लागली.हे लाडू चविष्ट तर आहेतच तसेच पौष्टिकही आहेत.सध्या त्यांचे लाडू पनवेल मधील पोळी भाजी केंद्र, दुकाने,stockist व सुपर मार्केट मध्ये उपलब्ध असतात. नेरूळ व सीवूड मधील Dailyneed मध्येही त्यांचे लाडू सहज उपलब्ध होतात.पनवेल मध्ये त्या स्वतः होम डिलिव्हरी देतात.

खरतर लाडू करताना कृतीत थोडीशी जरी चूक झाली, प्रमाणात चूक झाली तर तो फसण्याची शक्यता जास्त असते.त्याची चव, रंग, पौष्टिकता सातत्याने टिकवणे हे आव्हानात्मक आहे. मात्र आपल्या अनुभवाच्या दिमतीवर व सर्व आव्हान पेलत रसिका ताई दररोज १० ते १५ किलो लाडू बनवतात. त्यांची ग्राहकसंख्या दिवसागणिक वाढतेय. पती व मुलाची भक्कम साथ त्यांना या व्यवसायात लाभते.या लाडू व्यवसायातून त्यांनी ४ ते ५ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.lockdown काळातही सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी त्यांच्या मदतनिसाना सहाय्य केले. त्यांचा हा रसिकराज ब्रँड त्यांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे पाठोपाठ महाराष्ट्राबाहेरही नेण्याचा मानस आहे. छोट्या व्यवसायापासून सुरूवात करून आपल्या मेहनत व गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्व खवय्यांचे लाडूचे लाड पुरवणाऱ्या रसिका ताईंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

संप्रर्कसाठी पत्ता - रसिकराज : ओंकारब्रम्ह, अदाईगाव पनवेल महाराष्ट्र ४१०२०६ फोन: 9619686627
Rasikraj Foods panvelkars Official*

https://bottom-words.blogspot.com/

Rava ladoo
Raigad.Online

गोड धोड झाले चला आता काही चटपटीत खाऊया !
नमकीन शंकरपाळे !!
10% off on Your First Order!

आजच आपली ऑर्डर बुक करा !!
Rasikraj Foods- +91 96196 86627
फ्री डिलिव्हरी *Terms & Condition Apply

😋 ❤️ ।रेसिपी Cart9 Raigad.Online

12/01/2023

राजमाता जिजाऊ सरकार
जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!


Malotkar Dinesh

Mahanagar palika, Opp. Mahad Bank, Near Panvel, Panvel, Maharashtra 410206
9892262575 | www.mahotsavdresswala.in

16/12/2022

A lifetime for by



Call for more details: 9136782326
www.pkbjewellers.in
[email protected]

This Wedding Season lets make an elegant choice by selecting


Reach Us at:
Mahatma Gandhi Road, Tapal Naka, Old Panvel, Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206



❄️

12/10/2022

Shubh

घेऊन आले आहे दीपावली ड्राय फ्रुट गिफ्ट बॉक्स !

आपल्या प्रियजनांना भेट द्या
सणांचा आनंद व्दिगुणित करा

आठवणींचा ठेवा ..आपल्या माणसांसाठी

आजच संपर्क करा आणि १०% सुट मिळावा ...
ऑफर १६ ऑक्टोबर पर्यंत मर्यादीत !

संपर्क : 7977903458

Dryfruit-Anand Box 500/-
(Approx. 100 gm each)
--------------------
Kaju
Badam
Salted Pista

Dryfruit-Utsah Box 600/- (Approx. 80 gm each)
---------------------------
Kaju
Badam
Salted Pista
Black Raisins

______________________________
Book your order before 16th October and get 10% off.

call: 7977903458
Cart9

Cart9 is multi vendor small scale industry for promoting business, social cause etc.

you can login

07/07/2022

तो येतोय ......
चला तयारीला लागूया.....
ढोल-ताशे-सजावट, घर सजवूया
हा #श्रीगणेशउत्सव Cart9 सोबत


Cart9 Raigad.Online cart9brand

तो येतोय ......चला तयारीला लागूया.....ढोल-ताशे-सजावट, घर सजवूयाहा  #श्रीगणेशउत्सव   Cart9 सोबत           cart9brand Raig...
07/07/2022

तो येतोय ......
चला तयारीला लागूया.....
ढोल-ताशे-सजावट, घर सजवूया
हा #श्रीगणेशउत्सव Cart9 सोबत


cart9brand Raigad.Online

11/05/2022

अश्रूंची झाली फुले नाटक
शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्यात प्रामाणिक माणसांची व शिक्षणाची होणारी गळचेपी हा ज्वलंत विषय मांडणारे प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हे गाजलेले नाटक. हे नाटक सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे 1966 मध्ये रंगमंचावर आणले होते. स्वत: पणशीकरांनी 2002 पर्यंत या सदाबहार नाटकाचे 1111 प्रयोग सादर करून ते अजरामर केले आहे.

मूळ संचात पणशीकर स्वत: प्रोफेसर विद्यानंद ही भूमिका सादर करत, तर लाल्याची भूमिका डॉ. काशीनाथ घाणेकर करत असत. सुमित्रेची भूमिका अभिनेत्री फैयाज तर शंभू महादेव चित्तरंजन कोल्हटकर साकारत.
घाणेकरांची स्टेजवर एंट्री करण्याची विशिष्ट पद्धत, संवादफेकीची ढब, सिगारेट पेटवण्याची लकब, विद्यानंदांना 'सर' अशी मारलेली हाक आणि 'कडक' या शब्दाची वैशिष्ट्यपूर्ण फेक या सगळ्याचं एक गारूड अजूनही मराठी नाट्य पर्यावरणात रुंजी घालतंय.

हे नाटक आहे माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांबद्दल. प्रोफ. विद्यानंद हे एक अगदी तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व. त्यांच्या विचारांनी आणि शिकवणीने त्यांनी अनेकांचे आयुष्य बदललेले असते. लाल्याही त्यांचाच विद्यार्थी. ध्येयहीन लाल्याला ते मार्ग दाखवतात, ध्येय ठरवून आयुष्याची वाटचाल करायला शिकवतात. लाल्या पोलिस ट्रेनिंगसाठी जातो आणि प्रोफ. विद्यानंदच्या कॉलेजवर एक नेता अधिराज्य गाजवू लागतो. कॉलेजचा वापर तो राजकारणासाठी करू लागतो. जेव्हा प्रोफेसर विद्यानंद त्यांना विरोध करतात व त्यांच्यासमोर झुकायला मानत नाहीत, तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं. तेव्हाच लाल्या पोलीस ट्रेनिंग पूर्ण करून कामावर लागतो. पुढे घडणारी कथा आणि बदल रोख विचार करायला भाग पाडणारे आहे. आपण आयुष्यात कितीही तत्वनिष्ठ वागलो वा जगलो, तरी कधी कधी आपल्या तत्वांना मागे सोडून परिस्थिती समोर झुकून बदल पत्करावा लागतोच, या कटू सत्याभोवती हे नाटक प्रवास करतं. पण त्यानंतर आपण स्वतःला ओळखू शकतो का? आपण माणूस म्हणून पूर्णपणे बदलतो का? आणि आयुष्यभर जी शिकवण उराशी कवटाळून बसलो होतो, ती बरोबर होती का? असे सगळे प्रश्न पाडणारं व उत्तरं देणारं हे नाटक आहे.

नाटकाची खरी ताकद आहे ती संवादांमध्ये. ‘उसमे क्या है?’, ‘आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतय…..’ही लाल्याची तोंडची वाक्य आता प्रेक्षकांची तोंड पाठ झाली आहेत. पण प्रोफेसर विद्यानंद यांची वाक्यही विचार करायला भाग पडतात. अनेक ‘अरे ख-याची झलक पाहिली आता खोट्याची मजा बघतोय मजा. पुण्यातील चव गेली आता पाप कशाशी खातात ते शोधतो आहे.’ ही वाक्य हमखास टाळ्या घेऊन जातात.

कानेटकरांवर असलेल्या शेक्स्पिअरच्या दाट प्रभावातूनच या नायकाची निर्मिती घडलेली आहे आणि ती अपूर्व आहे. नाटकभर जीवनविषयक तत्त्वज्ञानाला विद्यानंदाच्या रूपाने भिडणारा नायक हे नाटकाचं बलस्थान आहे.आजही एक प्रभावी संहिता म्हणून आपण या नाटकाकडे बघतो.

MarathiStars.com zee marathi Lata Mangeshkar Raigad.Online मराठी ब्लॉग - Marathi Blog BBC News Marathi मराठी पदार्थ (Food Recipe) Subodh Bhave Shreyas Talpade Marathi Traveller

 #वरणभात--------------------------------------------------------------वरण भात हा महाराष्ट्रीयन लोकांच्या आहाराचा अविभाज्...
19/04/2022

#वरणभात
--------------------------------------------------------------
वरण भात हा महाराष्ट्रीयन लोकांच्या आहाराचा अविभाज्य घटक आहे. जेवणाच्या पानातील एक अढळ स्थान घेतलेली हि मंडळी, ताटात नसली की काहीतरी चुकल्या सारखे वाटते. बालगोपाळांपासून ते वयस्कर व्यक्ती पर्यंत ज्या एका पदार्थाने सर्वांचे #आयुष्य व्यापले आहे तो म्हणजे
“वरण भात “…! वाफाळत्या भाताच्या मुदिवर #गरमागरम वाढलेले वरण, त्यावर घरचे कढवलेले साजूक #तूप व सोबत लिंबाची फोड ही #महाराष्ट्रीयन माणसासाठी आनंदाची व्याख्या आहे.जेवणाच्या पानात वाढतांना नेहमी डावे-उजवे व मध्य साधण्यासाठी किंवा त्याआधीच वरण-भात हवा.

आठव्या महिन्यात बाळाचे उष्टावन (अन्नप्रशान विधी) झाल्यानंतर बाळाला भरवला जाणारा अन्नपदार्थ म्हणजे साजूक तूप घातलेला मऊ पातळसर वरण भात. अत्यंत सोपा आणि चविष्ट! अगदी बोळकी बसवलेल्या आजोबांना देखील तो तेवढेच सुख देतो.लग्नमुंजीतल्या पंगतीच्या जेवणात असो की नैवेद्याच्या पानात मानाचे स्थान मिळवणारा पदार्थ आहे.पाककलेतील कोणतेही विशेष कौशल्य ना वापरता तयार होणारा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.

वरण भात हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे,फायबर्स मुबलक प्रमाणात असतात. पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.असा हा वरण भात ,पारंपरिक पण नव्याशी जुळवून घेणारा , गरीबाचे पोट भरणारा ,श्रीमंतांचे चोचले पुरवणारा.
मागच्या काही वर्षात मात्र ,तथाकथित काही कॅलरी concious लोकांच्या मानसिकतेमुळे त्याचे स्थान कमी झाले आहे .जेवणाच्या पानातील त्याचा मान कमी झाला आहे . #डाएट प्लॅन च्या नावाखाली ,त्याला आहारातून वगळण्यात आले आहे.

सध्याच्या बुफे संस्कृतीमध्ये आणि #पंजाबी, #चायनिज पदार्थांच्या मांदियाळीत वरण भाताचे महत्त्व कमी झाले नसले तरी.....त्याची जागा आता दाल फ्राय आणि जीरा राईस यांनी घेतली आहे.

महाराष्ट्रीयन पदार्थाच्या हॉटेलमध्ये सुद्धा वरण भात हा मेनू कार्ड मध्ये अभावानेच सापडतो.... आपण नव्या गोष्टींसोबत जुन्याचीही कास धरायला हवी हे नक्की..
जगप्रसिद्ध #आहारतज्ञ असे सांगतात कि जे पूर्वापार चालत आलेले सकस आहार जर आपण ठेवला तर ... शरीररिक प्रकृती आणि प्रवृत्ती नेहमी छान राहते ...

#मराठी #मराठीपदार्थ Cart9 Raigad.Online cart9brand MarathiStars.com Rujuta Diwekar
#विजयकर्णिक #मुंबईनगरपालिका

Photo-Credits:
https://www.youtube.com/watch?v=wtkJvalYr9c

Address

Neel Samruddhi 1
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cart9 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share