27/07/2025
१. महाराष्ट्र संस्कृती : महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास इ. स. पूर्व २३५ ते इ. स. १९४७ - पु. ग. सहस्त्रबुद्धे
मूळ किंमत : ७५० रु | सवलतीत : ६४० रु
या ग्रंथात इ. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे. या प्रदीर्घ काळाचे चार विभाग पडतात. सातवाहन ते यादव (इ. पू २३५ ते इ. स. १३१८) हा पहिला विभाग. १३१८ ते १६४७ हा मुस्लिम सत्तेचा काळ म्हणजे दुसरा विभाग. हाच बहामनी काल होय. १६४७ ते १८१८. हा मराठा काल म्हणजे तिसरा विभाग आणि १८१८ ते १९४७ हा ब्रिटिश सत्तेचा काळ म्हणजे चौथा विभाग होय.
धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. प्रत्येक कालखंडातील या आठही अंगांचे विवेचन उपलब्ध माहितीच्या आधारे केले आहे.
२. श्री तुकारामांच्या अभंगांची चर्चा खंड १ व २ - वासुदेव पटवर्धन / गणेश केळकर
मूळ किंमत : ९१० रु | सवलतीत : ७२५ रु
३. चांदसैली - कमलेश महाले
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १७० रु
महाराष्ट्राच्या सीमेवरच्या सातपुड्यातल्या ह्या 'चांदसैली' नावाच्या डोंगरवाटेचा अनुबंध तुझ्या कवितांमध्ये शोधतांना काहीतरी नवे जाणवले. तुझा हा पहिलाच कवितासंग्रह फार आशादायी आहे. स्वतःशी संवाद साधणाऱ्या कविता उत्तम आहेत. वंचित कष्टकरी अभागी स्त्रियांचे वास्तव संदर्भ आणि परिसराचे सतत भान प्रभावी वाटते. 'दिवस फक्त पिळून वाळवत घातलाय उद्यासाठी' किंवा 'अजिंठ्यातल्या पद्मपाणीच्या फुलांचा सुगंध' ह्या प्रतिमा फार लोभस आहेत. - भालचंद्र नेमाडे
४. शेक्सपिअर आणि त्याचा नाट्यसंसार - प्रदीप कुलकर्णी
मूळ किंमत : ७५० रु | सवलतीत : ६०० रु
पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे शेक्सपिअरच्या सगळ्या नाटकांची सविस्तर ओळख करून देणे शक्य नसले, तरी प्रदीपने सर्व महत्त्वाच्या व गाजलेल्या नाटकांचे कथानक, त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांतील नाट्य अतिशय चित्तवेधक पद्धतीने मांडले आहे. या ग्रंथाने मराठी साहित्यविश्वाला खूप समृद्ध केले आहे, हे मात्र नोंदवायला हवे. - कुमार केतकर
५. फॅरनहाईट ४५१ - रे ब्रॅडबरी / अनु. माया पंडित
मूळ किंमत : ३०० रु | सवलतीत : २५५ रु
'फॅरनहाईट ४५१' ही भविष्यकाळाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भयावह जगाचं भाकीत करणारी विलक्षण कादंबरी आपल्याला अक्षरशः झपाटून टाकते. या भविष्यकालीन जगात पुस्तकांवर बंदी आलेली आहे आणि ती जाळण्यासाठी फायरफायटर्सचा एक खास टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे. पुस्तकं लोकांमध्ये कमालीचा बेबनाव आणि भयंकर दुःखं पेरतात, म्हणून ती बाळगायला नि वाचायला बंदी आहे. गाय मॉन्टॅग या टास्कफोर्समधे काम करतो. त्याच्याही घरात पुस्तकं लपवलेली आहेत का? टास्कफोर्सनं एक यांत्रिक कुत्रा तयार केलाय. त्याच्या तोंडात जालीम विष भरलेली एक सुई बसवलेली आहे. त्याला हेलिकॉप्टरमधून इकडे तिकडे नेलं जातं. जी विद्रोही माणसं समाजाचे आदेश धुडकावून पुस्तकं सांभाळून ठेवतात नि वाचतात त्यांचा शोध घेऊन हा कुत्रा त्यांचा निकाल लावतो.
६. मधसूर्यछाया - रोन्या ओथमान / अनु. राजेंद्र डेंगळे
मूळ किंमत : ३५० रु | सवलतीत : २८० रु
७. अबुझमाडचे अनुनाद - नरेन्द्र / आवधूत डोंगरे
मूळ किंमत : ४९९ रु | सवलतीत : ४०० रु
नरेन्द्र यांचा १९८०च्या दरम्यान मध्य भारतातील अबुझमाड या आदिवासी प्रदेशाशी पहिल्यांदा संपर्क आला. एका अभ्यासप्रकल्पाचा भाग म्हणून ते तिथे गेले. पण इथे अभ्यास करणं निरर्थक आहे, त्यापेक्षा नुसते अनुभवच घेत राहिलेलं बरं, असं त्यांच्या मनात आलं. मग २०१३ पर्यंत ते या प्रदेशात सुरुवातीला अगदी आत, आणि नंतर बाहेरच्या बाजूला बस्तरमधील गावात राहिले. अबुझमाड नि बस्तर इथल्या तीस वर्षांच्या अनुभवांचे अनुनाद शब्दांमध्ये नोंदवण्याचा प्रयत्न त्यांनी सदर पुस्तकातून केला आहे.
८. जनामनातला माणूस निळू फुले - रजनीश जोशी
मूळ किंमत : ३२५ रु | सवलतीत : २६० रु
पाच दशकं मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत खलनायक म्हणून वर्चस्व गाजवणारा हा कलावंत, प्रत्यक्ष जीवनात मात्र अतिशय मवाळ वृत्ती असणारा, तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याहीपेक्षा अखेरच्या श्वासापर्यंत माणूसपण जपणारा एक सच्चा 'माणूस' होता.
निळू फुलेंना एक माणूस म्हणून समजून घेताना कुटुंबप्रमुख, सामाजिक कार्यकर्ता ते अभिनेता असा सर्वांगाने वेध घेण्याचा हा प्रयत्न.
९. पुराभिलेखविद्या - शोभना गोखले
मूळ किंमत : ५०० रु | सवलतीत : ४५० रु
शिलालेख आणि ताम्रपट ही प्राचीन इतिहासलेखनाची अस्सल साधने होत. त्यांच्या आधारे प्राचीन लिपी, भाषा, राजकीय परिस्थिती, समाज, धर्म, वाङ्मय इत्यादी गोष्टींचे ज्ञान मिळते. हे ज्ञानभांडार ब्राह्मी लिपीमध्ये बव्हंशी होते आणि ते दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत सर्वस्वी दुर्बोध होते.
१०. गावकी - रूस्तुम अचलखांब (आत्मचरित्र)
मूळ किंमत : १५० रु | सवलतीत : १२५ रु
११. मेड इन इंडिया - पुरुषोत्तम बोरकर (कादंबरी)
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : २०० रु
१२. सिद्ध - राजन खान (कादंबरी)
मूळ किंमत : ८०० रु | सवलतीत : ६०० रु
१३. मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण - रोहिणी तुकदेव
मूळ किंमत : ३९५ रु | सवलतीत : ३१५ रु
या ग्रंथात मराठी कादंबरीचा उगम या सांस्कृतिक वस्तुस्थितीची अपूर्णमित संकल्पनेच्या आधारे मीमांसा केली आहे. तसंच तिचं प्रारंभीच्या काळातलं रूप समजून घेण्याचं आव्हान एकोणिसाव्या शतकातल्या लुप्तप्राय झालेल्या १३५ कादंबऱ्यांच्या साहाय्याने पेललं आहे.
१४. कारमाझफ बंधू भाग १ व २ - फ्योदर दस्तयेवस्की / अनु. भाऊ धर्माधिकारी
मूळ किंमत : १००० रु | सवलतीत : ८५० रु
एका रशियन सौंदर्यवतीच्या प्रेमातील बापलेकांच्या स्पर्धेचा परिणाम म्हणून होऊ घातलेली 'पितृहत्या' घडते. परंतु कोर्टात गुन्हेगार ठरविला जाणारा मीत्त्या खरोखर खुनी नसतोच. या घटनेभोवती गुंफलेली ही प्रदीर्घ कादंबरी एका रोमांचकारी नाट्याचे विलक्षण दर्शन वाचकाला घडविते. सूत्रहीनता, नास्तिकता, ईश्वराचे अस्तित्त्व, विषयलंपटता यांचे भेडसावणारे विश्लेषण असामान्य व्यक्तिरेखांबरोबरच येथे सामोरे येते.
१५. भूमिगताची टिपणे - फ्योदर दस्तयेवस्की / अनु. अनिल आंबीकर (अनुवादित कादंबरी)
मूळ किंमत : ७५ रु | सवलतीत : ७० रु
१६. शापित कोझाकीण - फ्योदर दस्तयेवस्की / अनु. अशोक डांगे (अनुवादित कादंबरी)
मूळ किंमत : १२५ रु | सवलतीत : ११० रु
१७. जुगारी - फ्योदर दस्तयेवस्की / अनु. जयंत दीक्षित (अनुवादित कादंबरी)
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १८० रु
१८. काकांचे स्वप्न - फ्योदर दस्तयेवस्की / अनु. अविनाश बिनीवाले (अनुवादित कादंबरी)
मूळ किंमत : १७५ रु | सवलतीत : १५ रु
१९. मराठी रंगभूमीच्या तीस रात्री : एक सामाजिक-राजकीय इतिहास खंड १ ते ३ - मकरंद साठे
मूळ किंमत : ३७७५ रु | सवलतीत : ३००० रु
'नाटक' हा मराठी माणसाचा मानबिंदू मराठी रंगभूमीला दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे आणि भारतीय स्तरावर तिचे महत्त्व खूप मोठे आहे. या रंगभूमीने कालानुरूप, परिस्थितीनुरूप अनेक स्थित्यंतरे पाहिली, नवे प्रवाह स्वीकारले, त्यामुळेच आजही नाटक आणि मराठी रंगभूमी स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. मकरंद साठे यांनी मराठी रंगभूमीच्या तीस रात्री या ग्रंथात मराठी रंगभूमीच्या गेल्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा लेखाजोगा घेतला आहे.
२०. आधुनिक लोकनाट्ये - संपा. डॉ. मोनिका ठक्कर
मूळ किंमत : ३५० रु | सवलतीत : २८० रु
२१. सोलो कोरस : शिकल्या अब्दुल्याची स्वगतं - साहिल कबीर (ललित)
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : २०० रु
२२. आह क्यूची खरी गोष्ट - लू शुन /अनु. डॉ. श्रीधर पवार
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १६० रु
२३. तिहार - प्रिया तेंडुलकर (कथा)
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : २०० रु
२४. समकाल - वसंत आबाजी डहाके
मूळ किंमत : २७५ रु | सवलतीत : २२० रु
समकालीन असणं म्हणजे आपल्या काळातल्या परिस्थितीचं, घटना-प्रसंगांचं, प्रश्नांचं, समस्यांचं केवळ चित्र रंगवणं, असं मी समजत नाही. आपल्या अनुभवातल्या कालावकाशातून मानवी स्वभावाविषयी, वृत्तिप्रवृत्तीविषयी, स्थितिगतीविषयी जाणीव निर्माण होणं, आपल्या काळाचा आणि युगाचा बोध होणं, मूल्यभान येणं, एकंदर मानवी जीविताविषयी सुखात्म अथवा दुःखात्म दृष्टी तयार होणं, मला महत्त्वाचं वाटतं. - वसंत आबाजी डहाके
२५. मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती - वसंत आबाजी डहाके
मूळ किंमत : ५५० रु | सवलतीत : ४४० रु
प्रस्तुत ग्रंथात मराठी भाषकांचे मौखिक-लिखित-मुद्रित साहित्य आणि त्यांचा इतिहास व त्यांची संस्कृती यांत काही अनुबंध आहे का याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे.
२६. मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक - वसंत आबाजी डहाके (समीक्षा)
मूळ किंमत : ५७५ रु | सवलतीत : ४३० रु
२७. पाखंडखंडण - प्रतिक पुरी (कादंबरी)
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : १९० रु
२८. भटक्या विमुक्त जमाती : आरक्षण आणि भूमिका - संपा. संतोष जाधव/ शीतल भांगारे
मूळ किंमत : २१५ रु | सवलतीत : १७० रु
२९. शहाणीव देणारी पुस्तकं - डॉ. वैभव ढमाळ (पुस्तकांवरचे पुस्तक)
मूळ किंमत : २१५ रु | सवलतीत : १७० रु
२९. स्टुडिओ - सुभाष अवचट (ललित)
मूळ किंमत : ३५० रु | सवलतीत : २८० रु
पॅलेटवरील अनेक रंगांच्या सरमिसळीप्रमाणेच आयुष्यातले अनेक अनुभव एकमेकांत गुंफत आपल्या चित्रनिर्मितीशी त्यांची सांगड घालत सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही अनोखी शब्दचित्रे. ही शब्दचित्रे आहेत कुमारांच्या गाण्याची, तर्कतीर्थांच्या व्यासंगाची, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान यांच्यापासून ते अगदी आचार्य रजनीशांपर्यंत अनेक व्यक्तींची.
३०. अखेरीस नयनाची गोष्ट - श्याम मनोहर (कादंबरी)
मूळ किंमत : ६९५ रु | सवलतीत : ५५५ रु
३१. मोेलिक आंबेडकर - संपा. भालचंद्र मुणगेकर / अनु. अनघा लेले
मूळ किंमत : ६७५ रु | सवलतीत : ५४० रु
'मौलिक आबेडकर'मध्ये आआंबेडकरांच्या प्रभावशाली लिखाणाचे सार समजून घेता येईल असे उतारे निवडले आहेत व त्यांची विषयवार मांडणी केली आहे. त्यामध्ये जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता, हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, स्त्रियांची मुक्ती, भारताचे शैक्षणिक धोरण, फाळणी आणि इतर अनेक विषय आहेत.
३२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर
मूळ किंमत : ८०० रु | सवलतीत : ६०० रु
३३. महात्मा जोतीराव फुले धनंजय कीर
मूळ किंमत : ५२५ रु | सवलतीत : ३९० रु
३४. लोकमान्य टिळक - धनंजय कीर
मूळ किंमत : ७७५ रु | सवलतीत : ५८० रु
३५.स्वातंत्र्यवीर सावरकर - धनंजय कीर
मूळ किंमत : ८२५ रु | सवलतीत : ६२० रु
३६. हिंदू धर्म आणि तत्वज्ञान - स. अ. डांगे
मूळ किंमत : ५०० रु | सवलतीत : ४५० रु
जे विद्वान् उपनिषदांत पूर्वीच्या कर्मकांडप्रचुर धर्माची प्रतिक्रिया आहे असे मानतात त्यांच्या विवेचनांत आणखी एक मुद्दा येतो तो हा होय - ते म्हणतात की ब्राह्मणग्रंथ ही पुरोहितवर्गाची संपदा होय. ब्राह्मणीय कर्मकांडाचा पसारा वाढविल्याने ब्राह्मणपुरोहित वर्गाने समाजात आपले वर्चस्व निर्माण केले. - पुस्तकातून
३७. जेेत रे जेेत - गो. नी. दांडेकर (कादंबरी)
मूळ किंमत : १७५ रु | सवलतीत : १५५ रु
३८. पवनाकांठचा धोंडी - गो. नी. दांडेकर (कादंबरी)
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १८० रु
३९. लाल प्रवाळ - युडीथ हेरमान / अनु. सुनंदा महाजन (अनुवादित कादंबरी)
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १८० रु
४०. महाराष्ट्रातील आदिवासी जमाती : सामाजिक सांस्कृतिक मागोवा - डॉ. गोविंद गारे
मूळ किंमत : ४०० रु | सवलतीत : ३६० रु
महाराष्ट्र राज्यातील ४७ आदिवासी जमातींची ओळख या ग्रंथांत लेखकाने विस्ताराने करून दिली आहे. त्या सोबत आदिवासी प्रदेश, आदिवासी विकासाच्या योजना, बदलते आदिवासी जीवन यांचीही माहिती ग्रंथांत विस्ताराने मांडली आहे.
४१. सातपुड्यातील भिल्ल : ऐतिहासिक आणि सामाजिक मागोवा - डॉ. गोविंद गारे
मूळ किंमत : ३५० रु | सवलतीत : ३१५ रु
४२. श्रीमद् भागवतातील स्त्रिया - विमल देशमुख
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १५० रु
४३. संविधान जागर ग्रंथमालिका : सहा पुस्तकांचा संच - संपादक : लक्ष्मीकांत देशमुख
मूळ किंमत : २४०० रु | सवलतीत : १८०० रु
भारतीय संविधान हाच आधुनिक भारताचा धर्मग्रंथ आहे! तिची मूल्ये आहेत- स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि प्रत्येकास कोणताही भेदभाव न करता दिलेले मूलभूत अधिकार. ते प्रत्येकाच्या मन, विचार आणि कृतीत उतरणे उदारमतवादी लोकशाही, लोकांचे सार्वभौमत्व आणि सामाजिक सौहार्दासाठी महत्त्वाचे आहे. थोडक्यात, प्रत्येकाने खऱ्या अर्थाने संविधान साक्षर होण्याची गरज आहे.
४४. पिंपळपान - गोविंदाग्रज (कवितासंग्रह)
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : २२५ रु
४५. सहा कथाकार - संपा. भालचंद्र फडके
मूळ किंमत : ३५० रु | सवलतीत : ३१५ रु
४६. छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी / अनु. कल्पना वांद्रेकर (चरित्र)
मूळ किंमत : ३५० रु | सवलतीत : ३१५ रु
एका अद्वितीय राष्ट्रपुरुषाचे अत्याधुनिक संशोधनावर आधारित आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आणि कारकीर्दीचा त्रयस्थ दृष्टिकोनातून घेतलेला वेध या चरित्राच्या पानांतून उलगडला आहे.
४७. जीवनसेतु - सेतुमाधवराव पगडी
मूळ किंमत : ६०० रु | सवलतीत : ५४० रु
संशोधक इतिहास तज्ञ , उर्दू-फारसी भाषांचे जाणकार, जेष्ठ विचारवंत सेतू माधवराव पगडी यांचे आत्मचरित्र.
४८. रान + शिवार + गाव - कॉनराड रिक्टर / अनु. जी. ए. कुलकर्णी
मूळ किंमत : ८०० रु | सवलतीत : ६४० रु
'The Trees' (१९३७). “The Fields (१९४७). 'The Town' (१९५०) या तीन कादंबऱ्यात कॉनराड रिक्टर यांनी गोऱ्या आणि इंडियन लोकांना जगण्यासाठी किती कष्ट करावे लागले व किती संकटांना तोंड द्यावे लागले याचे चित्रमय वर्णन केले आहे.
४९. स्वातंत्र्य आले घरा - कॉनराड रिक्टर / अनु. जी. ए. कुलकर्णी (अनुवादित कादंबरी)
मूळ किंमत : १२५ रु | सवलतीत : १०५ रु
५०. माणसे अरभाट आणि चिल्लर - जी. ए. कुलकर्णी (व्यक्तिचित्रण)
मूळ किंमत : १६० रु | सवलतीत : १३५ रु
५१. मुग्धाची रंगीत गोष्ट + बखर बिम्मची - जी. ए. कुलकर्णी (बालसाहित्य)
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १७० रु
५२. पैल पाखरे - जी. ए. कुलकर्णी (कथा)
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : २०० रु
५३. सोनपावले - जी. ए. कुलकर्णी (कथा/नाटक)
मूळ किंमत : ३०० रु | सवलतीत : २५५ रु
५४. स्मरण जीएंचे - संपा. अप्पा परचुरे (आठवणी)
मूळ किंमत : ३०० रु | सवलतीत : २५५ रु
५५. विचारशिल्प : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निवडक निबंध - संपा. रा. ग. जाधव
मूळ किंमत : ७५ रु | सवलतीत : ७० रु
५६. बळीवंश - डॉ. आ. ह. साळुंखे
मूळ किंमत : ५५० रु | सवलतीत : ४४ रु
५७. विद्रोही तुकाराम - डॉ. आ. ह. साळुंखे
मूळ किंमत : ६०० रु | सवलतीत : ४८० रु
५८. आस्तिकशिरोममणी चार्वाक - डॉ. आ. ह. साळुंखे
मूळ किंमत : २७० रु | सवलतीत : २१ रु
५९. सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध - डॉ. आ. ह. साळुंखे
मूळ किंमत : ८५० रु | सवलतीत : ६८० रु
६०. निवडक ठणठणपाळ - जयवंत दळवी (विनोदी लेख)
मूळ किंमत : ३०० रु | सवलतीत : २४० रु
६१. परम मित्र - जयवंत दळवी
मूळ किंमत : ४०० रु | सवलतीत : ३२० रु
रॉय किणिकर, पु. ल. देशपांडे, खांडेकर, तळवलकर, भागवत, खांबेटे यांसारख्या लेखक व प्रकाशक मित्रांचे व्यक्तिचित्रण व आठवणी.
६२. आत्मचरित्राऐवजी - जयवंत दळवी
मूळ किंमत : ३५० रु | सवलतीत : २८० रु
दळवींच्या आयुष्यातील व्यक्ती-घटना-प्रसंग या विषयींचे हे मार्मिक लेखन गजालीच्या स्वरूपात वाचकांसमोर उलगडत जाते आणि वाचक त्यात गुंतत जातो.
६३. भारतातील जाती : त्यांची यंत्रणा, उद्भव आणि विकास आणि जातीचे उच्छेदन - डॉ. बी. आर. आंबेडकर
मूळ किंमत : ४४० रु | सवलतीत : ३७५ रु
सर्वात पहिली व महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे ती ही की हिंदू समाज ही एक मिथ्यकथा आहे. हिंदू हे नावही परकीय आहे. एतद्देशीयांना ते मुस्लिमांनी आपल्याला त्यांच्यापासून वेगळे काढण्यासाठी बहाल केले. मुस्लिमांच्या स्वाऱ्यांच्या पूर्वीच्या कुठल्याही संस्कृत ग्रंथात ते आढळत नाही. त्यांना आपले असे एक सामायिक नाव असावे अशी गरज भासली नाही. कारण त्यांनी एक जमात स्थापन केल्याची कल्पना त्यांना नव्हती. ते फक्त जातींचे एक संकलन होते. प्रत्येक जातीला आपल्या अस्तित्वाची जाणीव होती. ती टिकून राहाणे हेच तिच्या अस्तित्वाचे गमक होते. जातींचे मिळून एक संघराज्यसुद्धा तयार होत नाही. हिंदू-मुस्लीम दंग्यांचे प्रसंग सोडल्यास एरवी एका जातीला आपण दुसऱ्या जातीशी जोडले गेल्याची जाणीव नसते. इतर सर्व प्रसंगी प्रत्येक जात इतर जातींपासून स्वतःला वेगळे काढण्याचा प्रयत्न करते.
६४. पुन्हा जीर्णोद्धार - श्री. म. भावे (पुस्ताकांवरचे पुस्तक)
मूळ किंमत : ४५० रु | सवलतीत : ३८० रु
६५. पानिपत १७६१ - त्र्यं. शं. शेजवलकर (इतिहास)
मूळ किंमत : ४०० रु | सवलतीत : ३२० रु
६६. ड्रॅगन जागा झाल्यावर - अरुण साधू
मूळ किंमत : ४२५ रु | सवलतीत : ३४० रु
साऱ्या जगाची झोप उडवणाऱ्या भावी महासत्तेची, उण्यापुऱ्या अर्ध शतकाची चित्तथरारक कथा.
६७. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि. ग. कानिटकर
मूळ किंमत : ६०० रु | सवलतीत : ४८० रु
नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
६८. कोसळता गावगाडा : २०१५ - उल्का महाजन
मूळ किंमत : ३२० रु | सवलतीत : २५५ रु
पहिल्या ७५ वर्षांत जेवढे बदल झाले, त्यापेक्षा तीव्र गतीने बदल गेल्या २०-२५ वर्षांत झाले आहेत. सरंजामी व्यवस्था ते औद्योगिक वित्तीय भांडवलशाही, असे तिहेरी स्थित्यंतर झाले आहे. या प्रवासात गाव कसे बदलते आहे, हे गावकऱ्यांच्या आठवणींतून समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
६९. भेेया एक्सप्रेस आणि इतर कथा - अनु. जयप्रकाश सावंत (अनुवादित कथा)
मूळ किंमत : ३८५ रु | सवलतीत : ३१० रु
७०. तेंडुलकरांच्या निवडक कथा
मूळ किंमत : ४०० रु | सवलतीत : ३२० रु
७१. तर. अशी सारी गंमत - चित्रा पालेकर (आत्मचरित्र)
मूळ किंमत : ७०० रु | सवलतीत : ५६० रु
७२. शेल्फी - गणेश मतकरी
मूळ किंमत : ५०० रु | सवलतीत : ४२५ रु
ज्या पुस्तकांनी आपल्याला अपार आनंद दिला त्या आनंदाची ओळख इतरांना करून द्यावी, इतरांना तो आनंद घ्यायला प्रवृत्त करावे असा सकारात्मक भाव या लेखांमध्ये आहे. खिशातल्या हिरव्या, निळ्या आणि गुलाबी कागदांपेक्षा काळी अक्षरे उमटलेल्या पांढऱ्या कागदांवर ज्यांचे मन जडले आहे अशा पुस्तकप्रेमी जमातीच्या एका शिलेदाराची पुस्तकप्रेमकहाणी आळवणारे हे एक सुरेल पुस्तक आहे.
७३. पुस्तकनाद - जयप्रकाश सावंत
मूळ किंमत : ३०० रु | सवलतीत : २५५ रु
प्रस्तुत लेखसंग्रहात पुस्तकं, नियतकालिकं, पुस्तकांची दुकानं, बाजार, पुस्तकांचे संग्राहक, दुर्मीळ पुस्तकांच्या शोधाच्या हकिकती, फुटपाथवरच्या पुस्तकांच्या दुकानांत अचानक सापडणारी मौलिक पुस्तकं, साहित्याच्या आणि त्यातील मूल्यवान आशयाच्या ओढीनं जवळ आलेल्या लेखकमित्रांच्या कहाण्या अशा अनेक गोष्टी येतात.
७४. जंटलमन चोर - दामोदर मावजो / अनु. शैला मावजो
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : २०० रु
दामोदर मावजो यांच्या 'जंटलमन चोर' या संग्रहातल्या कथांचा सामाजिक आणि प्रादेशिक पैस विस्तीर्ण आहे. या कथांमध्ये नाट्यमय आणि योगायोगप्रधान प्रसंगरचना प्राधान्याने दिसत असल्या, तरी असे प्रसंग पात्रांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या अनुभवांच्या रूपाने येत असल्यामुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतात आणि त्या पात्रांशी वाचकाचा सहानुभाव प्रस्थापित होतो. - नीतीन रिंढे
७५. महानगर - मिलिंद बोकील
मूळ किंमत : २५० रु | सवलतीत : २०० रु
शहरी व्यवस्थेत माणूसपणा वाढतो की कमी होतो? मिलिंद बोकील यांच्या या कथांमध्ये मनातील अंतर्द्वद हे अंधार-प्रकाश, दिवस-रात्र, यांत्रिक-भावनिक अशा द्वैती ताणातून व्यक्त होतं. हा ताण शोधणं हे या कथांचं सूत्र.
७६. महात्मा जोतीराव फुले - उमेश बगाडे
मूळ किंमत : २४० रु | सवलतीत : १९५ रु
जोतीरावांच्या विचारसरणीने व कार्यकर्तृत्वाने जातिविद्रोहाचे व मानवमुक्तीच्या लढ्याचे युग घडवले आहे. त्यामुळेच मृत्यूनंतर शंभर वर्षे लोटूनही जोतीरावांचे व्यक्तित्व, विचार व चरित्र सामाजिक प्रेरणेचा अक्षय्य स्रोत होऊन अखंडपणे कार्य करत राहिले आहे.
७७. धम्मपद आणि गीता - अविनाश सहस्त्रबुद्धे
मूळ किंमत : २०० रु | सवलतीत : १७० रु
धम्मपदाला 'बौद्धांची गीता' म्हटले जाते. पण खरे तर वर्णभेदाला, विषमतेला किंचितही थारा न देणारा मानवतावाद हा आजच्या युगाचा धर्म झालेला असल्यामुळे त्याची शिकवण देणारे धम्मपद हे आजच्या मानवाची गीता आहे असे म्हणावे लागेल.
७८. आसिफजाही : निजाम राजवटीचा इतिहास खंड १ - संपा. सरफराज अहमद
मूळ किंमत : ३९५ रु | सवलतीत : ३१५ रु
औरंगजेबच्या मृत्यूनंतर उदयास आलेली आसिफजाही दक्षिणेतील महत्वाची राजवट आहे. या सत्तेचा दखनेच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक लोकजीवनावर मोठा प्रभाव आहे. पहिला असिफजाह निजाम उल मुल्कपासून अखेरचे आसिफजाह मीर उस्मानअलीपर्यँतचा काळ दक्षिण भारताच्या इतिहासाचे अभिन्न अंग आहे. या इतिहासाची साधने मराठीत आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.
७९. आपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर
मूळ किंमत : ५५० रु | सवलतीत : ४६५ रु
सवंग सुख ही संस्कृती, अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद-उपनिषदांपासून फुले-आगरकरांपर्यंत, सॉक्रेटिस-प्लेटोपासून चॉम्स्की-डेरिडापर्यंत पूर्व-पश्चिमेतील प्रमुख विचारवंतांचा अन् त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध.
८०. गांधी उद्यासाठी - संपा. दिलीप कुलकर्णी
मूळ किंमत : ६०० रु | सवलतीत : ५१० रु
मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षापूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला.
आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत ! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच 'जिवंत आहेत' असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत, त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून 'उद्या'साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न