Garden Making

Garden Making We provide garden making service on small and big scale

01/06/2026
30/05/2026
कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्काचे महत्व...     शेताच्या बांधावर कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या अ...
03/02/2026

कीड व्यवस्थापनात निंबोळी अर्काचे महत्व...

शेताच्या बांधावर कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात. या निंबोळ्या मे महिन्याच्या शेवटी तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करुन पाच टक्के निंबोळी अर्क घरच्याघरी तयार करता येतो.

निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो. कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फवारला जातो. रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्या ढेकून, पतंगवर्गीय किडींमध्ये गुलाबी बोंडअळी, घाटेअळी, शेंडे व फळे पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळअर्काचा उपयोग होतो.

कडुनिंबाच्या बियामध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यातील अझाडिरॅक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल हे महत्त्वाचे घटक आहेत. निंबोळी अर्काचा किडीवर विविध प्रकारे परिणाम होतो. तसेच मित्र कीटकांचे आणि पर्यावरणाचे संवर्धन होते. त्यामुळे मित्र कीटकांद्वारे जैविक कीड व्यवस्थापन होते.

निंबोळी अर्काचा किडीवर काय परिणाम होतो?

निंबोळी अर्काचा प्रभाव हा वेगवेगळ्या किडींवर वेगवेगळ्या प्रकारे होतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत. निंबोळी अर्क किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात. कडुनिंबाची पाने व बियामध्ये अॅझाडीरेक्टीन, निंम्बिन व निंम्बिडिन, मेलियान ट्रीओल सालांन्नीन हे महत्त्वाचे घटक आहेत.

पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत

उन्हाळ्यात निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून साफ कराव्यात आणि साठवून ठेवाव्यात. साठवलेल्या निंबोळ्या फवारणीच्या एक दिवस अगोदर कुटून बारीक कराव्यात.

पाच किलो निंबोळी चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रात्रभर भिजत ठेवाव्यात. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ लिटर पाण्यातील निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. गाळलेल्या अर्कात एक लिटर तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावं. हे मिश्रण एकूण शंभर लिटर होईल एवढं पाणी टाकावं.

म्हणजे हा ५ टक्के निंबोळी अर्क फवारणीसाठी तयार होतो. फवारणीसाठी त्याच दिवशी तयार केलेला निंबोळी अर्क वापरावा. उरलेला चोथा जमिनीमध्ये मिसळावा त्याचा खत म्हणून उपयोग होतो X

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा वापर करून रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीच्या खर्चात बचत करता येते.

त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळून मित्र किडींचे संवर्धन होऊन पर्यावरणाचा समतोल राखता येतो. गावातला प्रत्येक शतकऱ्याने निंबोळ्या जमा करून कमी खर्चात निंबोळी अर्क तयार करावा. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळेल.

स्त्रोत - कृषीपत्रिका, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

पपनस … कोकणचं आश्चर्य.. मित्रानो कोकणात पिकणारं असं हे उत्कृष्ट फळ. पण सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोकणा...
03/02/2026

पपनस … कोकणचं आश्चर्य..

मित्रानो कोकणात पिकणारं असं हे उत्कृष्ट फळ. पण सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोकणात काही शेकड्यातच झाडं आहेत असा उल्लेखही मिळाला. तेव्हा आपल्या परसात जर झाड असेल तर ते तोडु नका. उलट त्याची रोपं तयार करा. एका चांगल्या फळाला आपण न्याय देवु शकत नसाल तर काय उपयोग ?
यापुढे पपनशीचं झाड तोडु नका. त्यातुन निदान पाच झाडं लावा हीच विनंती.

हे सगळं कशाला ? पपनस बचाव मोहीम चालु करुयात. खाली सगळी माहिती देतोय. वाचा. त्याचं महत्व लक्षात घ्या.

" पपनस वाचवा "

अधिक माहिती व उपयुक्तता

पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा असे आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो असे म्हणतात.

पपनसाचे फळ
पपनसाचे झाड ३० ते ३५ फुट उंच वाढते. पानांचा रंग गडद हिरवा असतो. पपनसाची फुले पांढऱ्या रंगाची असतात. झाडाला फुलांचे गुच्छ लागतात. फळे मोठ्या चेंडूच्या आकाराची,हिरव्या सालीची, १० ते ३० सेंमी व्यासाची असतात. वजन सुमारे १-२ किलोग्रॅम भरते. फळे पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते. फळ सोलले की आत पांढऱ्या रंगाचे बरेच जाड भुसभुशीत आवरण असते. ते सोलल्यावर आत मोसंब्याप्रमाणे फोडींची रचना असते. पांढरा गर किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगाचा गर असलेल्या पपनसाच्या दोन जाती आहेत. फळ कच्चे असेल तर गर बराच कडवट लागतो. फळ पिकल्यावर हा कडवटपणा कमी होतो. बियांपासून रोपे तयार करता येतात.

आढळ
महाराष्ट्रातील कोकणात विशेषत: ही झाडे जास्त प्रमाणात आहेत.

स्थानिक नाव
पपनसाला 'चकुत्र' 'बंपर' आणि 'चकोत्रा' अशा स्थानिक नावानी ओळखले जाते. पपनीस / पपनस

वापर
पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. पपनसाचा गर पौष्टीक तसाच ज्वरनाशी आहे. पपनसाचा गर साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यापासून मुरंबे, मार्मालेड असे पदार्थ बनवतात. फुलांपासून अत्तर तयार करतात. लाकूड थोडेसे कठीण असते.त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करतात.

मुख्य म्हणजे पपनसाच्या सालीपासुन ती उन्हात सुकवुन पावडर करुन मधातुन खाल्ल्यास ज्वर नाष होतो. ओली साल चावुन त्याचा रस पियाल्यास रक्तदाब नियंत्रणात येतो. पपनसाच्या सालीची चटणी पौष्टीक व पोट विकार घालवणारी असते. मोसुंब व संत्र या प्रमाणे त्याचे ज्युस पिण्यास उत्तम. साखर व मीठ चवीप्रमाणे घालुन घेतल्यास उन्हाचा त्रास कमी हितो. उन्हाळ्यात निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे. डोळ्यात आंजुर्ली झाल्यास साल चिमटीत धरुन दाबुन रस डोळ्यात उडवल्यास आंजर्ली बरी होते. याचा रस काढुन ठेवता येतो. सरबत अतिशय छान होते. आंबा काजु रातांबा या प्रमाणे हे ही एक उत्कृष्ट फळ आहे.

Address

Dombivli
421204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Garden Making posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category