Sea Food Fresh Daily

Sea Food Fresh Daily Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sea Food Fresh Daily, Shopping & retail, Belapur.

Mr Fish and chickenSEA FOOD FRESH DAILY
07/08/2021

Mr Fish and chicken
SEA FOOD FRESH DAILY

25/07/2021
25/07/2021

मासे खा स्वास्त रहा .
मागवा ताजे मासे फक्त आपल्या दुकाना तुन ठेत घरी
फक्त आनी फक्त
SEA FOOD FRESH DAILY
MR. FISH AND CHICKEN

Fresh silver pomfret
27/02/2021

Fresh silver pomfret

19/02/2021
14/09/2020

*मासे खा फिट्ट रहा....*

मासे हे जीभेच चोचले पुरवण्यासोबतच
शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांचा स्त्रोत आहेत. माशांपासुन विविध खाद्यपदार्थ बनवताना तेल आणि मसाल्यांचा कमी प्रमाणात वापर केला तर प्रथिने, लोह, कॅल्शियम या पोषक घटकांचा मुबलक पुरवठा होऊ शकतो.

*बोंबील* : बोंबील हा मासे प्रेमींचा आणि पोषक घटकांनी भरपुर असा मासा आहे. बोंबलामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे हे घटक असतात. शिवाय चरबीचे प्रमाण चांगले असते. इतर माशांच्या तुलनेत या माशात लोहाचे प्रमाण अधिक असल्याने अॅनिमिया असणाऱ्या व्यक्तींना खुप उपयोगी आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, नखे, केस आणि त्वचा यांच्या आवश्यक असलेले घटक बोंबलामध्ये भरपुर प्रमाणात असतात.

*कोळंबी* : कोळंबीत तंतुमय घटक, प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, जीवनसत्व B, फाॅस्परस व काॅपर यांचा चांगला स्त्रोत असतो. कोळंबीत आयोडीन असल्याने
आरोग्यास चांगली ठरते. मात्र कोळंबीत कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने कमी प्रमाणात खावी. कोळंबीचे अतिसेवन केल्यास अ‍ॅलर्जी होते. अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी कोळंबी खाणे टाळावे.

*चिंबोरी किंवा खेकडा* : चिंबोरी किंवा खेकड्यांत उच्च प्रतीचे कॅल्शियम असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते
याच्या मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेड कमी प्रमाणात असल्याने मधुमेह रुग्णांसाठी
उत्तम पर्याय आहे. चिंबोरी किंवा खेकड्यांतील अॅन्टीआॅक्सीडन्ट
घटक कर्करोगाशी संबंधित पेशींची संख्या आटोक्यात ठेवतात असा दावा केला जातो. शिवाय प्रथिने, ओमेगा ३,जीवनसत्त्वे यांचे प्रमाणही जास्त आहे. मेंदुच्या संरक्षणासाठी यामधील सेलिनियम हा घटक उपयुक्त ठरतो. रक्तपेशींच्या निर्मितीसाठी जीवनसत्त्व B12 मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच अॅनिमिया होण्याचा धोका देखिल कमी होण्यास मदत होते. चिंबोरी
किंवा खेकडा यामध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत होते.
चिंबोरी किंवा खेकडा खाल्ल्यामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी होऊ शकते.
अ‍ॅलर्जी विशेषतः, शरीराला सुज येणे, अंगावर लाल पट्टे येणे, शिवाय श्वसन संबंधित अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो.

*शिंपला* : शिंपल्यात प्रथिने जास्त व उष्मांक कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी यांचा आहारात समावेश करावा. मानसिक ताण कमी करण्यास व उत्साहवर्धकतेसाठी शिंपले चांगले आहेत. शिंपल्यात जीवनसत्त्व ड व क हे घटक असतात.

*सुरमई* : इतर माशांप्रमाणे यामध्ये प्रथिने व ओमेगा ३ हे घटक असतात. या माशांमध्ये पारा (Mercury) या खनिजाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा मासा आठवड्यातुन एकदा किंवा दोनदाच खावा. याच्या अति सेवनाने पारा हे खनिज मूत्रपिंड व मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो.

*पापलेट* : पापलेटमध्येही प्रथिने व ओमेगा ३ यांचे प्रमाण जास्त असते. चांगले डोळे व त्वचेसाठी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे यांत असतात. चवीला छान तसेच फारसे काटे नसल्याने खवय्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

*बांगडा* : बांगडा हा मासा उष्ण असुन यांत कॅल्शियमचा स्त्रोत असतो. शिवाय ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्व ड व क हे घटक असतात.
बांगडा शक्यतो कालवण बनवुन खावा. त्यामुळे यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकुन रहाते.

*रावस*: रावसामघ्ये ओमेगा ३, प्रथिने तसेच जीवनसत्व अ, ब क, ड हे घटक असतात. रक्तदाब आणि काॅलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रावस या माशाचा चांगला फायदा होतो.

*मासे कसे खाल..?*

*1* शिजवण्यापुर्वी मासे व्यवस्थित साफ करुन स्वछ करावे. विशेषतः कोळंबीच्या पोटात एक काळी नस असते ती काढून टाकावी, शिंपलेही स्वछ धुवुन घ्यावेत. समुद्राच्या पाण्यामघील वाळु आत असण्याची शक्यता असते. समुद्रातील माती पोटात गेली तर पचना संबंधित आजार उद्भवु शकतात.

*2* माशांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण भरपुर प्रमाणात असते.
मासे कढईत भरपुर प्रमाणात तेल घालुन तळण्यापेक्षा तव्यावर सोडून तळावे. किंवा कालवण, आमटीत घालुन शिजवून खावेत. मात्र रस्सा बनवताना खोबरे वापर गरजेपुरताच असावा. अन्यथा अतिरिक्त तेल व नारळामुळे रक्तदाब व काॅलेस्ट्रोल वाढण्याची भीती असते.

*3* त्याशिवाय मासे शिजवताना पातेल्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे पोषक घटक टीकुन रहातात. तसेच खुप शिजवल्यास जीवनसत्वे कमी होतात.

*4* माशांपासुन विविध पदार्थ तयार केले जातात. सुपही छान होते.

*5* मासे वाळवुनही ठेवता येतात.
उदा. बोंबील, बांगडा, कोलंबी (करंदी हा पण छोट्या कोळंबीचा प्रकार आहे) वगैरे.

Bangada fish
03/09/2020

Bangada fish

Red prwans small size FRESH
03/09/2020

Red prwans small size FRESH

SEA FOOD FRESH DEALIYSURMAI WHOLE FISH PRICE TO SALE
03/09/2020

SEA FOOD FRESH DEALIY
SURMAI WHOLE FISH PRICE TO SALE

SEA food fresh dailySilver pomfret 1kg 3pices
03/09/2020

SEA food fresh daily
Silver pomfret 1kg 3pices

Address

Belapur

Telephone

+919930109108

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sea Food Fresh Daily posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sea Food Fresh Daily:

Share