Saket Book World

Saket Book World मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील महत्त्व?

आजचा दैनिक सकाळ 🙏
02/08/2025

आजचा दैनिक सकाळ 🙏

"ज्ञान हीच खरी भेट आहे! 🎄 "ख्रिसमस स्पेशल ऑफर! ❄️ आता तुमच्या आवडत्या पुस्तकांवर २०% सूट! 📖🎁"
21/12/2024

"ज्ञान हीच खरी भेट आहे! 🎄 "ख्रिसमस स्पेशल ऑफर! ❄️ आता तुमच्या आवडत्या पुस्तकांवर २०% सूट! 📖🎁"

साकेत प्रकाशनाची अर्थविषयक पुस्तके आता इंग्रजीमध्येही...सीए उमेश शर्मालिखित 'लेट्स टॉक जीएसटी' आणि 'लेट्स टॉक इनकम टॅक्स...
02/09/2024

साकेत प्रकाशनाची अर्थविषयक पुस्तके आता इंग्रजीमध्येही...

सीए उमेश शर्मालिखित 'लेट्स टॉक जीएसटी' आणि 'लेट्स टॉक इनकम टॅक्स' या दोन अर्थविषयक पुस्तकांचे प्रकाशन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ श्री. राजेंद्र दर्डा, सीए अशोक पाटील, सीए रुपाली बोथरा, सीए आर बी शर्मा आणि प्रकाशक श्री. बाबा भांड यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न.

16/08/2024

ख्यातनाम कवी, गीतकार आणि अभिनेते सौमित्र यांची साकेत बुक वर्ल्डला भेट...

Location: Sri Hari safalya Building, Naralabag, Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad), Maharashtra 431001.

02/04/2024
आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रकाशनाचे आधारस्तंभ : ज्येष्ठ कवी श्री. ना. धों. महानोरआमच्या प्रवासात त्यांची साथ लाभली.आन...
03/08/2023

आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रकाशनाचे आधारस्तंभ : ज्येष्ठ कवी श्री. ना. धों. महानोर

आमच्या प्रवासात त्यांची साथ लाभली.
आनंदात त्यांनी प्रोत्साहन दिले.
संकटात धीर दिला.
चांगल्या कामांचं कौतुक केलं.
महाराष्ट्राचे ते साहित्य रत्न
त्यांनी निर्माण केलेले शब्दधन
आमचा वारसा आहे.
मराठी साहित्य परंपरेतील या
ते एक सोनेरी पान होते.
त्यांना आमच्या साहित्य कुटुंबाकडून
भावपूर्ण श्रद्धांजली.

बाबा भांड
आणि
साकेत प्रकाशन परिवार

आज मंगलाताई नारळीकर हे जग सोडून गेल्याची नकोशी बातमी येऊन थडकली आणि मन विषण्ण झालं.जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ श...
17/07/2023

आज मंगलाताई नारळीकर हे जग सोडून गेल्याची नकोशी बातमी येऊन थडकली आणि मन विषण्ण झालं.
जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ शास्त्रज्ञाची सहचारिणी इतकीच त्यांची ओळख सीमित नव्हती.
स्वतः गणितज्ञ, मोठ्या पदांवर कार्यरत असणाऱ्या बहुआयामी मंगलाताई कर्मालाच ईश्वर मानत होत्या. याबरोबरच त्या तत्त्वनिष्ठ व तितक्याच संवेदनशील होत्या.
कॅन्सरशी झुंज देतानाही त्यांच्या कामाचा आवाका थक्क करणारा होता.
नारळीकर सरांची व स्वतःची पुस्तके तयार होताना त्यात जातीनं लक्ष घालण असो वा सामाजिक बांधिलकी म्हणून दारिद्र्यरेषेखालील मुलींना शिकवणे असो की लांबचा प्रवास करून येताच माहेरवाशीण लेकीसाठी लगेचच केक करायला घेणे असो, त्यांचा याही वयातील उत्साह अचंबित करणारा होता.
प्रापंचिक जबाबदाऱ्या आवडीने सांभाळताना आणि जगद्विख्यात शास्त्रज्ञाची पत्नी म्हणून तेवढ्याच तोलामोलाची साथ देताना त्यांची प्रज्ञा कधी झाकोळली गेली नाही.
पुस्तक किंवा पुस्तकेतर विषयांवर बोलताना त्यांचं अद्ययावत ज्ञान, कामाप्रति बांधिलकी व गुणवत्तेचा ध्यास याची वारंवार प्रचीती यायची.
त्यांच्यापुढे आम्ही सर्वार्थाने लहान असूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायला त्या कधी विसरल्या नाहीत.
वैयक्तिक आयुष्य किंवा कामाविषयीची चर्चा असो, त्यांच्या मार्गदर्शनाने आमचं आयुष्य समृद्ध झालं. निगर्वी मंगलाताई आमचा मोठा प्रेमळ आधार होत्या. मंगलाताई, तुमचा सहवास अजून हवा होता.

त्यांच्या जाण्याने साकेत परिवाराची वैयक्तिक हानी झाली आहे. भावपूर्ण श्रध्दांजली🙏

जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
23/04/2023

जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

आजचा सकाळ, सप्तरंग पुरवणी. उत्कृष्ट व प्रेरक लेख…
05/03/2023

आजचा सकाळ, सप्तरंग पुरवणी. उत्कृष्ट व प्रेरक लेख…

Address

Bhanusaheb Kabra Marg
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10:30am - 9:30pm
Tuesday 10:30am - 9:30pm
Wednesday 10:30am - 9:30pm
Thursday 10:30am - 9:30pm
Friday 10:30am - 9:30pm
Saturday 10:30am - 9:30pm
Sunday 10:30am - 9:30pm

Telephone

+918888864229

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saket Book World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saket Book World:

Share

Category