AJ Book's Shop

AJ Book's Shop Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AJ Book's Shop, Book shop, Amravati.

●पुस्तकाचे नाव:संध्याकाळच्या कविता●लेखक:कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) ●प्रकाशक:पॉप्युलर प्रकाशन●पुस्तकाची पाने:८०●किंमत:११५ ...
24/05/2021

●पुस्तकाचे नाव:संध्याकाळच्या कविता
●लेखक:कवी ग्रेस (माणिक गोडघाटे)
●प्रकाशक:पॉप्युलर प्रकाशन
●पुस्तकाची पाने:८०
●किंमत:११५ ₹-/
●पुस्तकाचा प्रकार:कवितासंग्रह

(कवी ग्रेस यांचे संध्याकाळच्या कविता व इतर सर्व साहित्य संपूर्ण भारतात घरपोच मिळवण्यासाठी ७५८८२६१०८० या क्रमांकावर व्हॅट्स करा)

संध्याकाळच्या कविता हा सुप्रसिद्ध मराठी कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांचा १९६७ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे. इन्ग्रिड बर्गमन या अमेरिकी अभिनेत्रीच्या दिशेने कवी ग्रेस यांनी (त्यांच्याच भाषेत) हा काव्यसंग्रह सोडून दिलेला आहे. [१] काव्यसंग्रहाच्या आरंभीच्या पृष्ठांमध्येच तसा स्पष्ट उल्लेख आहे. पाश्चात्य कलाकाराला मराठी साहित्यिकाने अर्पण केलेली ही बहुधा पहिलीच साहित्यकृती असावी. या संग्रहातील 'स्मरणशिल्प' या चौथ्या काव्यगुच्छात 'इन्ग्रिड बर्गमन्‌' या शीर्षकाची एक कविता आहे.

१९६० चे दशक सरता सरता पॉप्युलरच्या 'नवे कवी नवी कविता' या मालेतून ना. धों. महानोर (रानातल्या कविता), शंकर वैद्य (कालस्वर), वसंत सावंत (स्वस्तिक), पुरुषोत्तम पाटील (तळ्यातल्या सावल्या) हे कवी पुढे आले. याच मालेत ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता आल्या.
एकूण सहा काव्यगुच्छांमध्ये हा संग्रह विभागलेला आहे. आषाढबन, चंद्रधून, मरणगंध, स्मरणशिल्प, ऊर्मिलेच्या कविता आणि बर्फाच्या कविता हे संग्रहातील काव्यगुच्छ आहेत. संध्याकाळी, सूर्य अस्ताला जात असताना निसर्गात उठणाऱ्या रंगतरंगांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कविता मानवी दुःखाचे अपूर्व चित्रण करतात आणि जड व चैतन्याच्या संगमावर तरळणाऱ्या संधिप्रकाशात इंद्रियगोचर सृष्टीपलीकडील अज्ञात प्रदेशाच्या लोभस खुणाही दाखवितात. या संग्रहात स्वतः कवीने पुस्तकाच्या अखेरीस दिलेल्या कालक्रमानुसार 'रंग' (जानेवारी १९५८) ते 'रंगास्त' (नोव्हेंबर १९६५) अशा सुमारे ८० कविता समाविष्ट आहेत.
ग्रेसच्या कवितेत सायंकालीन गूढ भावार्त मनस्थितीचा व्याकूळ सूर लागला आहे. ही पर्युत्सुकता सौंदर्यशास्त्राचे एक वैशिष्ट्यच आहे. मनाला भिजवून टाकणाऱ्या तरी निथळून जाणाऱ्या सायंकालीन संवेदना पकडताना ग्रेस यांनी वेगळीच प्रतिमासृष्टी निर्माण केली आहे. नवकाव्यातील यंत्रयुगीन, पाश्चात्यसंदर्भसंपृक्त प्रतिमासृष्टीहून वेगळी असलेली ग्रेसची प्रतिमासृष्टी लोकजीवनातून, भारतीय सांस्कृतिक संचितातून जन्म घेते. तलम, रेशमी, सांस्कृतिक संदर्भसंपन्न प्रतिमासृष्टी आपले परंपरेत रूजलेले भावविश्व अलगद जागे करते आणि गूढ, अपार्थिव, भारतीय मनात झिरपत आलेले ‘अरूपाचे रूप’ दाखवीत जाते.[२]

दुर्बोधता?
एकूण चार काव्यगुच्छांपैकी 'आषाढबन' या गुच्छातील 'उखाणा' ही कविता अतिशय मासलेवाईक आहे.
शुभ्र अस्थींच्या धुक्यात

खोल दिठीतली वेणा
निळ्या आकाशरेषेत
जळे भगवी वासना.
पुढे मिटला काळोख
झाली देऊळ पापणी;
आता हळूच टाकीन
मऊ सशाचा उखाणा.

"कविता अनेक रुपांनी समोर येते. तिच्याकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असू शकते. चित्रकार चित्र काढतो ते समोर दिसेल तसे. तसंच कवी सुरूवातीस कविते करतो ते घटना, प्रसंग किंवा वर्णनांवर. पण ज्याप्रमाणे क्रिएटिव्ह चित्रकाराला व्यक्त् होण्यासाठी सामान्य चित्रकला पुरेशी वाटत नाही, चित्राच्या माध्यमांतून मनातली वादळे, अस्व्स्थता, अशांतता या बाबींना तो चित्रबद्ध करू पाहतो तेव्हां त्याला वेगळं काही करावंसं वाटतं. मग त्याच्या मदतीला येतात त्या प्रतिमा. तुलनात्मक रित्या त्या भावनांची तीव्रता प्रगल्भ रसिकाला जाणवण्यासाठी प्रतिमेतून चित्रं मांडण्याने ते गूढ होत जाते. कुणी त्यास दुर्बोध म्हणेल. पण कविता समजण्यासाठी रसिकालाही प्रगल्भ असावे लागते. प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी, डॉ वि भा कुलकर्णी, ना. घ. देशपांडे यांची याबाबतची मतं अभ्यासूंनी पहावीत.

अशाच प्रकारे कवीलाही जाणिवांच्या प्रदेशात आपली कविता पोहोचतेय ही जाणीव होऊ लागते तेव्हां ती फक्त कविता राहत नाही. प्रत्येक साधकाला समाधीअवस्था, किंवा ध्यानावस्था पहिल्याच प्रयत्नात जमेल असं नाही. पण सरावाने अनेकांना ते जमू शकतं. पण प्रयत्नही न करता ध्यान अथवा समाधी याबद्दल शेरे मारण्याने नुकसान कुणाचंच होत नाही. ग्रेसजींच्या कवितेचं असंच आहे. या प्रतिमा मनात वादळं निर्माण करतात, किंवा शांतता. इथे अर्थाला स्थान कुठेय ?

खवळलेला समुद्र मनात अस्वस्थता निर्माण करतो, तर शांत समुद्र धीरगंभीर भाव. ओहोटीचा समुद्र निराशा उत्पन्न करतो, ढोबळमानाने या प्रतिमा अशा प्रकारे आपल्या भावनांचं प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारे परंपरागत प्रतिमांमधून कविता त्याच त्याच पठडीत अडकल्यासारखी वाटले कि सर्जनशील कवीला नव्या प्रतिमा धुंडाळायला हव्यात हे जाणवू लागतं. एखादा कवी कुठली प्रतिमा कशी वापरतो हे कधी कधी त्याचा अभ्यास् असेल तरच लक्षात येतं. किंवा खूपदा वाचल्यानंतर सुसंगती लागण्याची शक्यता असतेही किंवा नसतेही. पण या प्रतिमा मनात चित्रं उमटवतात हे नक्की. ही उमटत काणारी चित्रमालिका एक अनुभव देते जो विलक्षण असतो हे ग्रेसजींच्या कुठल्याही कवितेत जाणवतं.

या कविता निव्वळ असंबद्ध असत्या आणि असा काही अलौकिक् अनुभव मिळत नसता तर ग्रेसजींना डोक्यावर् घेतले गेले असते का हा खरा प्रश्न आहे. हा संपूर्ण अभ्यास नसताना तोंडसुख घेण्याची एक पद्धत अलिकडे येऊ पाहते आहे जी अत्यंत घातक आहे.

या सर्वांना मुंगी उडाली आकाशी चाफा बोलेना, चाफा चालेना

या कवितांचे अर्थ विचारले असता ते निरुत्तर होताना दिसतात. या कविता आवडलेल्या आहेत हे मान्य तर करावेच लागते. मराठीत कविता ही काही काळ अध्यात्मवादी राहिली. संतांनी तिला फुलवली. त्यामुळे अध्यात्मातल्या अनेक प्रतिमा आज मराठी कवितेत आहे. ज्यांना गझल शिकण्यासाठी फार्सी, अरबी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ आहे त्यांनी अध्यात्मवादी कविता किमान नजरेखालून घालायला काय हरकत आहे ?

ग्रेसजींच्या कवितेत तर राघव, सीता या पौराणिक व्यक्ती , देवदेवता देखील प्रतिमा म्हणून सहज येतात. अहिल्येचा उल्लेख झाल्यास अहिल्येच्या कहाणीचा संदर्भ त्यात असणार हे उघड आहे. कवितेचा आशय पाहता अहिल्येच्या कहाणीचा नेमका कोणता संदर्भ लागू होतो हे पाहणे सोयीचे ठरते. अवतरण चिन्हातील मजकूर् हा या पानावर माझी भर असून वेळ मिळेल तसा नवा मजकूर इथे लिहिण्यात येईल"

मैत्रेयी भागवत्

याने ग्रेस कोणता परिणाम साधतात? स्वतः निर्मात्याने काही बोलल्याखेरीज ह्या कूटप्रश्नाचा निकाल लागणेच शक्य नाही असे वाटते. पहिल्या कडव्यात वेदनेचा संबंध डोळ्यांशी जोडलेला आहे. दुसऱ्या कडव्यातील 'पापणी' हा शब्दही साहचर्य दाखवितो पण एकंदरीत कविता म्हणून कुठलाही अर्थबोध ह्यातून होत नाही. अर्थाचे केवळ अंदाज बांधत राहणेच हाती उरते.
'पहाट' या कवितेत ग्रेस म्हणतात :
रित्या मुठीत झाकला

शुक प्रभेचा अनंत,
स्पर्शास्पर्शांत गोंदले
स्वप्न राधेचे हिवाळी.

पहाटेच्या रित्या मुठीतून सूर्य उदयास येतो आणि त्याच्या स्पर्शाने चराचर प्रकाशित होते असा सौंदर्यानुभूतीचा अनोखा प्रत्यय ही कविता देते जरूर पण राधेचा उल्लेख इथे का आणि राधेचे हिवाळी स्वप्न कोणते? या प्रश्नांची उत्तरे या कवितेमधून मिळत नाहीत. मातृत्वाचे साफल्य ही कल्पना कवीला अभिप्रेत आहे असे मानल्यास काहीसा अर्थ उलगडतो खरा पण तोही एक अंदाजच ठरतो.
"वरील समीक्षेबाबत टिप्पणी कराविशी वाटते. रित्या मुठीत झाकला, शुक प्रभेचा अनंत यातली शुक ही प्रतिमा वेदव्यास पुत्र महर्षी शुक यांच्याबाबत आहे. वेदनिपुण आणि अनंत प्रतिभा असलेले शुक रित्या मुठीत झाकून घेताना... इथे ग्रेसजींच्या कल्पनाशक्तीला, प्रतिभेला दाद द्यायची कि नाही ? ग्रेसजींची विद्वत्ता, व्यासंग हे समकालीन साहित्यिक, समीक्षक यामधे आढळत नाही. हा व्यासंग त्यांच्या कवितेत सहज दिसून येतो. अनेकदा सचिन तेंडुकलर आत्मविश्वासाने २० -२० स्पर्धेतला फटका टेस्ट क्रिकेट मधे खेळताना दिसतो. त्याचप्रमाणे पहिल्या द्विपदीत महाभारतातील प्रतिमा तर दुस-या द्विपदीत रामायणातील प्रतिमा हे अनेकदा त्यांच्या कवितेत दिसून येत. इथे त्या प्रतिमेचा व्यक्तीविशेष, स्वभावविशेष किंवा त्या प्रतिमेबाबत ठळकपणे समोर येणारी बाब इतकाच त्याचा वापर अपेक्षित असतो. "

मैत्रेयी भागवत

तसेच 'निर्मिती' ह्या कवितेचे.
अशा लाघवी क्षणांना

माझ्या अहंतेचे टोक
शब्द फुटण्याच्या आधी
ऊर दुभंगते हाक.

हाकेने ऊर दुभंगवल्यावरच शब्द फुटतात ही कल्पना सुंदर आहे पण कुणाची हाक? कसली हाक?
'चंद्रधून' या गुच्छातील 'पांढरे हत्ती' ही कविताही अशीच दुर्बोध ठरते. 'संध्याकाळचा सौंदर्यप्रत्यय' इथपासून ते 'अद्भुताचा झपाटून टाकणारा अनुभव' इथपर्यंत (ओढूनताणून) अर्थाच्या अनेक शक्यता ही कविता निर्माण करते. ग्रेस यांच्या कवितेत येणाऱ्या प्राचीन सांस्कृतिक प्रतिमा आणि यक्षिणींचे वाहन म्हणून पांढरा हत्ती असा अन्वय लावल्यास अर्थशोध सुलभ होईल असे वाटते खरे पण .. चाळीस वर्षे झाले पांढरे हत्ती 'अंधारबनातच' आहेत!
'कावळ्यांचा रंग' या कवितेतील अखेरचे कडवे असे आहे :
रात्र आंधळ्या कौलांची

कुणी आढ्याला बांधली
चंद्र पडला मरून
इथे पहाडाच्या खाली.

पहिल्या दोन ओळी अर्थबोध घडवितात पण मरून पडलेल्या चंद्राचे काय? पहाड कोणता? चंद्र का, कसा 'मेला'? कवितेतून तर काहीही सुचत नाही अशी स्थिती होते.
पानांच्या जाळीमधले

वाऱ्याचे कुंडल डुलते
ओठांची मिथिला ल्याया
पदरातुन नभ व्याकुळते

'मिथिला' ही एक पुराणकालीन नगरी आहे. ओठांची मिथिला म्हणजे काय? ती कशी ल्यायची? कवी ग्रेस यांच्या एका कन्येचे नावही मिथिला आहे. 'मिथिलेचे ओठ' असे तर त्यांना म्हणायचे नाही?
कवी ग्रेस यांचा आत्मा संध्याकाळच्या प्रहरी एकटा एकटा होतो हे त्यांच्या कवितांमधून सहज लक्षात येते. त्या आत्म्यातून एक अनुभवस्रोत वाहतो हे त्यांच्या भावाकुल, लयात्म शब्दांतून आणि ओळींतून जाणवते. हा स्रोत आंधळ्या प्रतीक्षेचा आहे. तिला एक 'स्वप्नगंध' आहे. तोच 'हरवला गंध' आहे. तोच 'मरणगंध' आहे. या प्रतीक्षाधर्मी स्रोताची दिशा धुक्यात लोपलेली आहे. ती कधी 'सांजबना'त, कधी 'अंधारबना'त आणि नेहमीच 'दुःखबना'त गोठून राहिलेली आहे.
प्रतीक्षा कशाची? कुणाची? कशाकरता? ग्रेस हे लपवतात. प्रतीक्षेचा शेवट आणि तिचा उगम कवितांमधून उलगडत नाही. शब्द ओळखीचे आणि अर्थही ओळखीचे पण अर्थाची सांगड मात्र जुळत नाही. त्यांची कविता भुलवते, अक्षरशः अवाक्‌ करून सोडते, काही वेळा अगदी थक्क करणारा प्रत्यय देते पण अर्थाच्या कोणत्याही दुलईत ऊब घेण्याचे ती नाकारते. या कवितेचा अर्थ हाच किंवा कवीला अभिप्रेत असलेला संदर्भ हाच याचीही हमी देता येत नाही.
सायास करूनही या कवितेशी संवाद साधता येत नसल्याने तिला दुर्बोध म्हणणे क्रमप्राप्तच आहे पण दस्तुरखुद्द ग्रेस यांच्या म्हणण्याप्रमाणेच ती कवितेच्या आकलनासंदर्भात अनेक मूलभूत प्रश्न निर्माण करते.

*2018 चा युवासाहित्य पुरस्कार प्राप्त कादंबरी....*●पुस्तकाचे नाव:फेसाटी●लेखक:नवनाथ गोरे●किंमत:२६० रु●पुस्तकाची पाने:188●...
23/05/2021

*2018 चा युवासाहित्य पुरस्कार प्राप्त कादंबरी....*

●पुस्तकाचे नाव:फेसाटी
●लेखक:नवनाथ गोरे
●किंमत:२६० रु
●पुस्तकाची पाने:188
●पुस्तकाचा प्रकार: कादंबरी

आजची मराठी कादंबरी अनेकस्तरीय जीवनानुभवामुळे समृद्ध आहे. समाजजीवनातील अनेकस्तरीय वाट, उपवाटांचे कथन तीमधून ध्वनित होत आहे. 'फेसाटी' या कादंबरीत पशुपालक, अल्पभूधारक शेतीसमूहातील तरुणाच्या संघर्षाची कथा साकारली आहे. नाथा गोरे या तरुणाच्या महाविद्यालयीन काळापर्यंतचा जीवनप्रवास या कादंबरीतून सांगितला आहे. हि जीवनकथा केवळ नकोशा शिक्षणव्यवस्थेपुरती सीमित नाही; तर त्यास अनेक कंगोरे आहेत. 'स्व' च्या शिक्षणप्रवासाबरोबरच कुटुंब आणि समाजातल्या अनेक महापेचांना ती साकार करते. दारिद्रयाचा शाप भली ल्यालेल्या आणि कर्जाच्या निरंतर सावटाखाली जखडलेल्या समाजाचे चित्र या जीवनकथेत समांतरपणे वाहते ठेवले आहे. गतविस्मृत ताईच्या गोठवलेल्या अपराधभावाच्या बोचणीतून या जीवनानुभावाला विवेकाचा स्वर प्राप्त झाला आहे. खेड्यातील व्यक्ती-समूहाची व्याधिकथा म्हणूनही तिला असाधारण महत्व आहे.
हा समाजपट सुंबरानच्या अख्यानरुपात गुंफला आहे. अतिशय ओघवत्या प्रवाही गद्याचे नितांत सुंदर परिमाण या गद्यकथेस आहे. गोष्टीवेल्हाळ आत्मपरता आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद व 'जत' परिसर बोलीची सहजता या कथनास आहे. 'जातु माझ्या मागाला, जातु माझ्या गावाला', 'सांगतु म्या जनाला', या दृष्टीने हि कथा सांगितली आहे. सगळीकडच वडं तुडुंब भरून वाहणारा भरघोस कथनऐवज तीमध्ये आहे. 'जवारी गई', 'शिंगरी', 'करंड', 'जुंधळं', 'येलतार' अशा अगणित शब्दरूपांनी या कथनाला सजीव बनविले आहे. अल्पाक्षरी शब्दबंधानी सजविलेले हे गद्य आहे. व्यक्ती, समाज, भू-जैविक वैशिष्टे आणि वर्तमान पेच साकारणारे नाथासुंबरानख्यान वैशिष्ट्यपूर्ण ठरेल.

●संपूर्ण भारतात ७५८८२६१०८० या क्रमांकावर व्हॅट्स अप करून ही कादंबरी आपण सवलतीच्या दरात घरपोच मागऊ शकता

मुस्कुराना सिखो दुनिया में, यहाँ बुजदिलों की गुजर नही होती,हँसना जरूरी है जिनें के लिये, रो करकें जिंदगी बसर नहीं होती.....
15/05/2021

मुस्कुराना सिखो दुनिया में, यहाँ बुजदिलों की गुजर नही होती,
हँसना जरूरी है जिनें के लिये, रो करकें जिंदगी बसर नहीं होती..
अब भी वक्त है संभल जाओं दोस्तों, क्योंकी जवानी उम्रभर साथ नहीं देती...

नभ प्रकाशन, अमरावती यांनी प्रकाशित केलेलं, लेखक प्रफुल आकोलकर यांचं माहितीपर आणि कविता, कथा, लेखातून सांस्कृतिक भावनेचा आढावा घेणारं 'शिदोरी.. आदरयुक्त संस्काराची'

●पुस्तक - शिदोरी... आदरयुक्त संस्काराची
●लेखक - प्रफुल आकोलकर
●प्रकाशक - नभ प्रकाशन
●किंमत - १०० रु
● सवलत मूल्य:७५ रु

संपूर्ण भारतात पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी संपर्क करा - ७५८८२६१०८०

-AJ Online Book shop-

11/05/2021

𝐀𝐉 𝐁𝐨𝐨𝐤'𝐬 𝐬𝐡𝐨𝐩

●खालील सर्व पुस्तकांवर २५% सूट उपलब्ध आहे.(मर्यादित कालावधी)

●संपूर्ण भारतात पुस्तके इंडिया पोस्ट किंवा कुरिअरने घरपोच मिळतील त्यासाठी शिपिंगचार्ज जो येईल तो आकारला जाईल.

●सर्व पुस्तके नवीन आहेत पुस्तके वाईट स्वरूपात आपल्या पर्यंत पोहचल्यास पुस्तके परत घेतल्या जातील.

●हे पुस्तके पाहिजे असल्यास व इतर कोणतेही पुस्तक हवे असल्यास ७५८८२६१०८० या क्रमांकावर व्हॅट्स अप करावे

१.फेसाटी(2018 चा युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी)
-नवनाथ गोरे
-कादंबरी
-२६०/१९५₹

२.पाधारो म्हारो देस
-विष्णू पावले
-प्रवास वर्णन
-२००/१५०₹

३.गयपात
-दिनकर दाभाडे
-कादंबरी
-२९९/२२६₹

४.बहुजन संस्कृतीचे जनक:महात्मा ज्योतिराव फुले
-प्रल्हाद जी.लुलेकर
-४००/३००₹

५.जोहार
-सुशील धसकटे
-कादंबरी
-३७०/२७८₹

६.धनगरी ओवीगीतांचा चिकित्सक अभ्यास
-प्रा.डॉ.तानाजी ज्ञा.पाटील
-संशोधन आणि अभ्यास
-२००/१५०₹

७.साहित्यसंशोधन वाटा आणि वळणे
-डॉ.सुधाकर शेलार
-संशोधन व अभ्यास
-१५०/११४

८.उसाच्या कविता
-कैलास दौड
-कवितासंग्रह
-१००/७५₹

९.तिफन
-दया सागर बंनने
-कविता हायकू
-१२०/९०₹

१०.अधांतरीचे प्रश्न
-अर्चना डावखर
-कवीतासंग्रह
-१२०/९०

११.कवितेची युद्धशाळा
-अक्रम हबीबखान पठाण
-समीक्षा
-२००/१५०₹

१२.चिगुर
-संजीवनी तडेगावकर
-ललित लेखसंग्रह
-१२०/९०₹

१३.कवितेची शैली
-महेंद्र कदम
-समीक्षा
-२००/१५०₹

१४.मराठी कादंबरी:आशय आणि अविष्कार
-दत्ता घोलप
-समीक्षा
-२००/१५०₹

१५.धनगरी ओवीगीतातील सांस्कृतिकता आणि भाषविशेष
-तानाजी पाटील
-समीक्षा आणि अभ्यास
-२००/१५०₹

१६.शब्दमात्र
-मंदार नाईक
-कवीतासंग्रह
-१३०/९८₹

१७.मळण
-रामराव अनिरुद्ध झुंझारे
-कादंबरी
-३१५/२३८₹

१८.अपूर्वाई
-पु.ल.देशपांडे
-प्रवासवर्णन
-३००/२२५₹

१९.काहूर
-चेतन बच्छाव
-कदंबरी
-३००/२२५₹

२०.वध आणि मोक्ष
-प्रतीक कांबळे
-कादंबरी
-१७५/१३३₹

जागतिक कविता दिनानिमित्य काही  निवडक कवितासंग्रहावर 15% सवलतव्हॅट्स अप करा-7588261080सवलत-22 मार्च 2021 पर्यंत
21/03/2021

जागतिक कविता दिनानिमित्य काही निवडक कवितासंग्रहावर 15% सवलत

व्हॅट्स अप करा-7588261080

सवलत-22 मार्च 2021 पर्यंत

18/03/2021
▫️गझलसम्राट सुरेश भटांची ही पुस्तके मिळवा संपूर्ण भारतात घरपोच.....📗१.एल्गार-२.झंझावत-३.सप्तरंग-४.रसवनतीचा मुजरा-५.रूपगं...
03/03/2021

▫️गझलसम्राट सुरेश भटांची ही पुस्तके मिळवा संपूर्ण भारतात घरपोच.....📗

१.एल्गार-
२.झंझावत-
३.सप्तरंग-
४.रसवनतीचा मुजरा-
५.रूपगंधा-
६.सुरेश भट यांच्या निवडक कविता-

संपर्क करा-७५८८२६१०८०

कित्ती बर होईल ना !एखाद्या पुस्तका विषयी आपण अनभिज्ञ असलो आणि नेमका त्याच पुस्तकाचा परिचय आधी झाला तर...       म्हणजे वा...
08/02/2021

कित्ती बर होईल ना !

एखाद्या पुस्तका विषयी आपण अनभिज्ञ असलो आणि नेमका त्याच पुस्तकाचा परिचय आधी झाला तर...
म्हणजे वाचायला वेगळीच रंगत येईल ....
काय म्हणता ! मग करू की सुरवात
आता रोज एका पुस्तकाचा परिचय तुम्हाला मिळेल तुमच्या व्हाट्सअप वर....

◽"७५८८२६१०८०" या क्रमांकावर "पुस्तक परीचय" असा मॅसेज करा आणि मिळवा आपल्या व्हाटस-अप वर दररोज एका नवीन पुस्तकाची माहिती.

डोक्यावरचं ओझं जड झालं तर ते मधूनमधून उतरवायची वा दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची सोय असते. पण जड झालेल्या आपल्या आयुष्याच...
05/02/2021

डोक्यावरचं ओझं जड झालं तर ते मधूनमधून उतरवायची वा दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची सोय असते. पण जड झालेल्या आपल्या आयुष्याचं ओझं असं दुसऱ्याला देता येत नाही. ते एकतर आपलं आपल्याला वाहावं लागतं नाहीतर जगण्याचा रस्ताच सोडावा लागतो.
प्रतिक कांबळे या तरूण कादंबरीकाराने आपल्या नव्या कादंबरीत हेच सांगितले आहे.
दयामरण या विषयावर ही कादंबरी प्रामुख्याने बोलत असली तरी त्याभोवतीने अनेक विषयांची चर्चा यात येते. आणि त्यासाठी अर्थात अनेक उप-कथानकं लेखकाला योजावी लागतात. मात्र त्या उपकथानकांच्या गोतावळ्यात कादंबरीचा नायक आणि पर्यायाने कादंबरी वाहत जात नाही. एखाद्या रहस्य चित्रपटाची पटकथा असावी, तशी कादंबरी शेवटाला वाचकाला मूळ प्रश्नाशी, म्हणजेच दयामरणाशी आणून सोडते.
अर्जुनच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून दयामरणाची भलामण केली आहे, तर इतर पात्रांच्या माध्यमातून त्याचे वेगवेगळे पैलू दाखवले आहेत.
कादंबरीचं कथानक सगळंच उघड केलं तर वाचकांची उत्सुकता निघून जाईल, त्यामुळे यातली मला भावलेली वैशिष्ट्ये फक्त नमूद करते.
संपूर्ण कादंबरी संवादातून उलगडत जाते. प्रसंगवर्णन वा स्थलवर्णन अगदीच एक-दोनदा येतं. यामुळे कादंबरीला आवश्यक वेग प्राप्त झालाय. केवळ तेरा दिवसांच्या काळात घडत असलेल्या ह्या घटनांमध्ये वेग हा मोठा घटक होता. तो वेग संवादांमुळे साधला गेलाय.
दुसरं वैशिष्ट्य असं की यातल्या व्यक्तिरेखा टोकाच्या काळ्या वा पांढऱ्या नाहीत, त्या समतोल आहेत. आजूबाजूची माणसं आहेत तशी उभी करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. तरूण पिढीवर असलेला भडकपणाचा प्रभाव कादंबरीभर कुठेच जाणवत नाही. प्रत्येक वेळेस वाचकाला वाटतं की अरे, खरं आहे हे... माणसं वागतात अशी. रहस्यकथा असूनही भडकपणा टाळणं, हे मोठं आव्हान होतं, ते लेखकाने पेललं आहे.
कोकणातल्या खेड तालुक्यातली बोलीभाषा कादंबरीत मध्येच येते, जो भाषिक प्रयोग छान आहे.
माणूस लग्न का करतो, याची उडत-उडत चर्चा एक-दोन प्रसंगात येते, जी परिपूर्ण नाही पण इंटरेस्टिंग नक्की आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इच्छामरण आणि दयामरण या विषयाकडे पुन्हा एकदा समाजाने, कायद्याने लक्ष द्यावं, आताचे कायदे बदलावे वा सुधारावे अशी आडून आडून सूचना ही कादंबरी करते, तर त्याबद्दल थोडंसं ....
अरूणा शानभाग या केईएम इस्पितळातल्या नर्सवर उद्भवलेल्या प्रसंगानंतर खरं तर दयामरण आणि इच्छामरण याची चर्चा भारतात सुरू झाली. पिंकी विराणी यांनी अरूणाच्या दयामरणासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. स्वत: रुग्ण दयामरण मागत नसल्यामुळे कोर्टाने याचिका फेटाळली. केईएममधल्या कर्मचाऱ्यांनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं. दयामरणाच्या कायद्यात बदल झाला नाही. यातलं सामाजिक भान वगळलं तर दयामरणाची मागणी करणाऱ्यांच्या स्थितीविषयी या याचिकेनंतरही फारशी चर्चा झाली नाही. 'अनुमती', 'मी अरूणा शानभाग' अशा कलाकृती पडद्यावर/रंगमंचावर आल्या पण त्यात भावनिक आंदोलनांनाच जास्त फूटेज दिलं गेलं. त्यामुळे या प्रश्नाची जी वास्तववादी (प्रॅक्टिकल) चर्चा व्हायला हवी ती झालीच नाही.
दयामरणाची विनंती करणारे बहुतांश रुग्ण हे असाध्य रोगाने अंथरुणाला खिळून असतात आणि कुटुंबातील इतरांनी आपल्यासाठी वेळ वा पैसा खर्च करू नये, असं त्यांना वाटत असतं. एक प्रकारे ते मरणाची इच्छा व्यक्त करत असतात पण त्यांचं मरण त्यांच्या हातात नसतं. ते दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून असतं.
तर इच्छामरणाचे रुग्ण असे गलितगात्र नसतात. ते आपल्या इच्छेनुसार धडधाकट मरू इच्छितात. आपल्या समाजात पूर्वापार 'प्रायोपवेशन' म्हणजे अन्नपाण्याचा त्याग करून शांतपणे मरणाला सामोरं जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. अनेक योगविद्यानिपुण लोक, ज्यांचा आधुनिक उपचारपध्दतीवर विश्वास नाही, ते इच्छामरण अवलंबितात. नुकत्याच निवर्तलेल्या ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांनीही शेवटच्या दिवसात अन्न-पाणी-औषध यांचा त्याग केला होता. जैन धर्मात अजूनही प्रायोपवेशनाचं प्रमाण मोठं आहे.
या पार्श्वभूमीवर या कादंबरीत मांडलेले प्रश्न दयामरणाचे दिसतात, इच्छामरणाचे नाहीत. त्यातही यातले रुग्ण आजाराला फारच लवकर कंटाळलेले दिसतात. त्यामुळे आजारपणापेक्षा मुलांच्या दुर्लक्षाचंच दु:ख त्यांना अधिक आहे, असं वाटत राहतं. म्हणजे मुलांनी लक्ष दिलं असतं तर त्यांनी आजारही हसत हसत सहन केला असता, असं कादंबरी नकळत सुचवते. त्यातही सुनेशी न पटणं जास्तच अधोरेखित झालं आहे. एकाकी सासरे विरूद्ध असमंजस सुना हेच याचं कारण आहे, असं चित्र यातून उभं झालं आहे. ते कदाचित लेखकाला अपेक्षित नसावं. बलात्कार झालेली अंजली वगळली तर बाकी सगळ्या पुरुष रुग्णांचीच कैफियत यात आली आहे. कादंबरीकाराने यांचा विचार करावा. जशी वैद्यकीय व कायदेशीर तथ्ये योग्य असल्याची खात्री करून घेतली आहे, तशीच काही सामाजिक तथ्यांची खात्री करून घ्यावी म्हणजे इतक्या उत्तम कलाकृतीत तेवढाही उणेपणा राहणार नाही.
हातात घेतल्यावर एका बैठकीत पुस्तक संपविण्याचा मोह होण्याच्या निकषावर मात्र कादंबरी पुरेपूर उतरते आहे. या तरूण होतकरू कादंबरीकाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

◆पुस्तकाचे नाव: वध आणि मोक्ष
◆लेखक:प्रतीक कांबळे
◆किंमत:१७५ ₹-/
(ऑल इंडिया फ्री होम डिलिव्हरी )
◆हे पुस्तक संपूर्ण भारतात घरपोच मिळवण्यासाठी"७५८८२६१०८०"या क्रमांकावर संपर्क करा

𝘼𝙅 𝘽𝙤𝙤𝙠'𝙨 𝙨𝙝𝙤𝙥

"अक्षरवांड्मय प्रकाशनाचे" सर्व पुस्तके आता AJ Book's Shop वर उपलब्ध...
02/02/2021

"अक्षरवांड्मय प्रकाशनाचे" सर्व पुस्तके आता

AJ Book's Shop वर उपलब्ध...

◆पुस्तकाचे नाव:शिकाल भाषण तर कराल शासन◆लेखक:युवराज गायकवाड●किंमत:५०१₹-/●सवलत मूल्य:३८०₹-/●संपूर्ण भारतात फ्री होम डिलिव्...
30/01/2021

◆पुस्तकाचे नाव:शिकाल भाषण तर कराल शासन
◆लेखक:युवराज गायकवाड
●किंमत:५०१₹-/
●सवलत मूल्य:३८०₹-/
●संपूर्ण भारतात फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध

ज्याप्रमाणे,
जंगलाचा राजा सिंह 🦁
पक्ष्यांचा राजा गरुड 🦅
फळांचा राजा आंबा 🥭
फुलांचा राजा गुलाब 🌹
रत्नांचा राजा हिरा 💎
देवांचा राजा इंद्र 🤴
नात्यांचा राजा मित्र 👬

त्याचप्रमाणे सर्व कौशल्यांचा राजा...
संभाषण कौशल्य..!🎙

आणि हेच कौशल्य विकसित करण्यासाठी,
"शिकाल भाषण, तर कराल शासन !"
हे युवराज गायकवाड सरांचे पुस्तक.📒

"शिकाल भाषण, तर कराल शासन!" या पुस्तकात आपण काय शिकाल?

🎤 भाषण कला

🎤 भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय

🎤 भाषणाच्या विषयाची निवड

🎤 भाषणाची तयारी

🎤 स्क्रिप्ट तयार करणे

🎤 भाषण तयार करताना श्रोता महत्वाचा

🎤 भाषणाची सुरुवात

🎤 भाषणाचा मध्य

🎤 भाषणाचा शेवट

🎤 भाषणाचा सराव

🎤कार्यक्रमात भाषणाच्या अगोदर

🎤 वक्तृत्वाचे सौंदर्य

🎤 देहबोली

🎤 आवाज

🎤 शब्द

🎤 बोलताना वक्त्याने कोणत्या गोष्टी करू नयेत

🎤 प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी

🎤 सूत्रसंचालन

🎤 कार्यक्रम पत्रिका

🎤 वक्त्याचे गुण

🎤 आधुनिक साधनांचा उपयोग

🎤 ऑनलाईन वक्ता

🎤 पोशाख आणि सौंदर्य

🎤 मुलाखतीला सामोरे जाताना

🎤 वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎤 विवाह सोहळा शुभेच्छा

🎤 निरोप समारंभ

🎤 श्रद्धांजलीचे भाषण

👉 संपूर्ण भाषण प्रशिक्षण असलेले हे पुस्तक.
👉 प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे आयुष्य बदलणारे पुस्तक.

■ हे पुस्तक संपूर्ण भारतात घरपोच मिळवण्यासाठी "७५८८२६१०८०" या क्रमांकावर संपर्क करा

-𝘼𝙅 𝘽𝙤𝙤𝙠𝙨 𝙨𝙝𝙤𝙥-

•प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.•पार्किन्सन...
29/01/2021

•प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

•पार्किन्सन या आजाराने त्यांना गेल्या काही वर्षांपासून ग्रासले होते.सारडा यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्र दान करण्यात आले

•सारडा यांनी ६०हून अधिक पुस्तकं लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांचं समीक्षण केलं आहे.

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when AJ Book's Shop posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category